हरिष गुप्ता / नवी दिल्लीप्रियंका गांधी या काही केवळ उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारक असतील असे नसून, काँग्रेस-समाजवादी पक्षाची जवळपास कोलमडून पडण्याच्या अवस्थेला पोहोचलेली युती सावरण्यात आणि पंजाबच्या राजकारणातही तेवढीच महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. प्रियंका गांधी यांनी राज्यसभेचे माजी सदस्य व माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना काँग्रेस पक्षात आणले. सिद्धू यांच्याशी प्रियंका गांधी यांनी संपर्क साधला. सिद्ध यांच्यासह त्यांच्या पत्नीशी अनेक वेळा चर्चाही केली. माजी आॅलिंपिक हॉकीपटू परगत सिंग यांना काँग्रेसमध्ये आणण्यातही प्रियंका गांधी यांची महत्वाची भूमिका आहे. भाजपवर नाराज असलेल्या सिद्ध यांना आम आदमी पक्षानेही निराश केले होते व त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. या अशा कठीण प्रसंगी प्रियंका गांधींच्या कार्यालयाने सिद्धू यांच्याशी संपर्क साधून बैठकांही आयोजित केल्या.अर्थात या घडामोडींची राहुल गांधी यांना जाणीव आहे. एकदा हे प्रश्न मार्गी लागल्यानंतर कॅप्टन अमरिंदरसिंग यांना दिल्लीला बोलावून घेऊन त्यांच्याशीही चर्चा करण्यात आली. शेवटी सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये यायचे व अमृतसर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवायचे ठरवले. सिद्धू यांना पक्षात आणण्यात आणि त्यासाठीच्या पुढाकारासाठी प्रियंका गांधी यांनी मुख्य भूमिका बजावल्याच्या वृत्तांना कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी दुजोरा दिला.
यूपी, पंजाबमध्येही प्रियंकांचे महत्त्व
By admin | Published: January 28, 2017 12:55 AM