पुणे : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश व उत्तर तमिळनाडूच्या किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कर्नाटक, विदर्भ, मराठवाड्यावरील कमी दाबाचे क्षेत्र आता विरले आहे़ त्यामुळे मराठवाडा व विदर्भातील किमान तापमानात पुन्हा घट होऊ लागली आहे़ कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली असून, मंगळवारच्या तुलनेत वाढ झाली आहे़ राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ८़२ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात झाले असून, ते तमिळनाडू, आंध्र प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे़ त्यामुळे आंध्र प्रदेश व तमिळनाडूच्या किनारपट्टीवर १५ व १६ डिसेंबर रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़
आंध्र प्रदेश, तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 1:37 AM