जळगाव- जि.प.च्या अध्यक्ष प्रयाग कोळी या दौरा आटोपून जि.प. मुख्यालयातील आपल्या दालनात येत असताना त्यांचे शासकीय वाहन जि.प.च्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनतळ नसल्याने अडकले. यावरून त्यांनी वाहनातून येऊन थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदू वाणी यांचे दालन गाठले व आपली नाराजी व्यक्त केली. कोळी या शासकीय वाहनाने मुख्यालयात येताना त्यांच्या वाहनास पार्किंगला जागा नव्हती. तसेच वाहन जाण्यासही अडथळा होता. सूचना देऊनही त्यांच्या वाहनासमोरील वाहने दूर होत नसल्याने त्या वाहनातून उतरल्या व थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी वाणी यांच्या दालनात पोहोचल्या. अधिकार्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसते. त्यामुळे पदाधिकार्यांच्या वाहनांसाठी जागा आरक्षित करावी, अशी मागणी त्यांनी वाणी यांच्याकडे केली. जलयुक्त शिवारच्या कामांची करणार तपासणीजि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष २० टक्के कमी किमतीमध्ये घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानच्या कामांची तपासणी करणार आहेत. कमी किमतीमध्ये घेतलेली कामे व्यवस्थितपणे व्हावीत, अशी अपेक्षा पदाधिकार्यांनी व्यक्त केली.
वाहन अडल्याने अध्यक्षांची नाराजी जि.प.त वाहनतळाची समस्या
By admin | Published: October 13, 2015 8:50 PM