नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालांपूर्वी विविध वृत्तवाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या एक्झिट पोलमधील अंदाजांमुळे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर काँग्रेस आणि यूपीएची चिंता वाढवली आहे. मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्ष निकाल लागल्यास काँग्रेसची चिंता दोन पातळ्यांवर वाढणार आहे. एकीकडे केंद्रात सरकार न बनल्यास पक्षाचा संघर्ष अधिकच वाढणार आहे, तर दुसरीकडे काही राज्यांमध्ये सुरू असलेली पक्षांतर्गत गटबाजी रोखण्याचे आव्हान काँग्रेससमोर असेल. जर ही गटबाजी रोखली गेली नाही तर काही राज्यांत काठावरच्या बहुमतासह स्थापन केलेली सरकारे संकटात येऊ शकतात. पंजाबमध्ये काँग्रेस बहुमतासह सत्तेवर आहे. मात्र मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यात उघड वाद सुरू आहे. सिद्धू हे मला मुख्यमंत्रिपदावरून हटवून स्वत: मुख्यमंत्री होऊ इच्छित आहे, असे अमरिंदर सिंह यांनी जाहीरपणे सांगितले होते.
लोकसभेच्या निकालांपूर्वी नेत्यांमधील अंतर्गत विरोधाने वाढवल्या काँग्रेसच्या अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 11:47 IST