समांतर रस्ता बळकावला अतिक्रमणांनी समस्या : तापी महामंडळ कार्यालयालगत नर्सरी, बांधकाम साहित्याने व्यापली जागा
By admin | Published: April 12, 2016 12:38 AM
जळगाव : वाढत्या अतिक्रमणांनी महामार्गालगतच्या समांतर रस्त्यालाही सोडलेले नाही. आकाशवाणी चौफुली ते ईच्छादेवी मंदिरापर्यंत एका बाजूने समांतर रस्त्याचा वापर नागरिकांना ये-जा करण्यासाठी होत असताना तापी महामंडळालगतचा समांतर रस्ता अतिक्रमणांनी हडप केला आहे.
जळगाव : वाढत्या अतिक्रमणांनी महामार्गालगतच्या समांतर रस्त्यालाही सोडलेले नाही. आकाशवाणी चौफुली ते ईच्छादेवी मंदिरापर्यंत एका बाजूने समांतर रस्त्याचा वापर नागरिकांना ये-जा करण्यासाठी होत असताना तापी महामंडळालगतचा समांतर रस्ता अतिक्रमणांनी हडप केला आहे. तापी महामंडळ कार्यालयाची कुंपण भिंतदेखील पुढे आलेली आहे. त्या लगतच आकाशवाणी चौकात मंदिराच्या आडोशाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. त्यापाठोपाठ तापीमहामंडळ कार्यालयाच्या कंुपण भिंतीलगत समांतर रस्त्यावर नर्सरीचे अतिक्रमण झाले आहे. या नर्सरी चालकांनी तर अगदी तारेचे कुंपणच करून घेतले आहे. मात्र तरीही त्याकडे संबंधित यंत्रणांना लक्ष द्यायला वेळ नाही. महामार्गावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी समांतर रस्त्यावर मुरूम टाकून कच्चे रस्ते का होईना नागरिकांच्या वापरासाठी तयार करण्याची भूमिका मनसेने सुरुवातीपासून घेतली आहे. याच मनसेचे गटनेते ललित कोल्हे हे आता उपमहापौर असून नगरसेवक अनंत जोशी यांच्याकडेच अतिक्रमणाच्या मोहीमेचे नियोजन सोपविण्यात आले आहे. त्यांनी तरी निदान या समांतर रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कार्यवाही करणे अपेक्षित आहे. --------बांधकाम साहित्य, जुने फर्नीचरसाठी अडविली जागाया समांतर रस्त्यावर तापी महामंडळालगत एका हॉटेलचे बांधकाम तोडण्यात आल्याने त्याचे वेस्ट मटेरियलचे ढीग टाकण्यात आले आहेत. तसेच या हॉटेलमधीलच जुने फर्नीचर व इतर साहित्यही या समांतर रस्त्याच्या जागेत ठेवून ही जागा अडविण्यात आली आहे. त्यालगत पुढे एका सिमेंटच्या तयार टाक्या बनविणार्या व्यावसायिकानेही अतिक्रमण करून समांतर रस्त्याची जागा बळकावली आहे. त्याकडे मनपाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष होत आहे.