शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

प्रचाराला ‘लसणा’ची फोडणी, घसरलेल्या किमतीने शेतकरी हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 5:00 AM

राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला.

- असीफ कुरणेजयपूर : राजस्थानातील प्रचार सभांमध्ये राहुल गांधी यांनी पिकाच्या घसरलेल्या किमतीचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित करून केंद्र व राज्य सरकारला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केला. प्रचाराच्या केंद्रस्थानी असलेले पीक म्हणजे लसूण. यंदाच्या प्रचारात लसणाची फोडणी जरा जास्तच बसली आहे. त्याचा ठसका कोणाला लागतो, हे ११ डिसेंबरला स्पष्ट होईल.मध्य प्रदेशच्या मंदसौर येथे २०१७ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनाचा मुख्य मुद्दा होता लसणाच्या घसणाऱ्या किमती. येथे पोलीस गोळीबारात सहा शेतकºयांचा बळी गेला होता. एक वर्षांनंतरही लसणाच्या किमती अजून घसरत असून, त्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. राजस्थानच्या पूर्वेकडील हाडोती भागात लसूण हे प्रमुख पीक आहे. या भागातून देशाच्या एकूण लसूण उत्पादनाच्या ४५ टक्के उत्पादन होते. लसणाचा भाव २०१६ मध्ये एका किलोला १०० रुपये होता. लसूण हे या भागातील नगदी पीक असून, उत्तम प्रतीच्या एका किलो लसणाला १३० रुपये किलो असा दरही मिळत होता. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी हे पीक घेतात.मात्र, नोव्हेंबर २०१६ मध्ये लागू झालेल्या नोटाबंदीनंतर परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. नोटाबंदीमुळे सर्वच शेतीमालाच्या किमती घसरल्या. राजस्थानमध्ये १ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर प्रामुख्याने लसणाची लागवड केली जाते. हे क्षेत्र २०१६ मध्ये ६९ हजार हेक्टर एवढे होते. मे २०१८ मध्ये बंपर उत्पादन झाल्यामुळे लसणाच्या किमतीत घसरण सुरू झाली. लसणाचा दर एका किलोला दोन रुपये किलो एवढा खाली आला. आधी १०० रुपये किलोवरून पाच रुपये किलो अशा किमती झाल्याने लसूण उत्पादक शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली. उत्पादन खर्च निघणे दूर, मार्केटमध्ये शेतकºयांना पदरचे पैसे मोजावे लागले.राजस्थान सरकारने शासकीय पातळीवर ३२ रुपये दराने लसूण खरेदी सुरू केली होती. पण, सरकारने एकूण उत्पादनाच्या निम्माच (७० हजार मेट्रिक टन ) लसूण खरेदी केला. हरभºयाचीही अशीच स्थिती असून त्याचा भाव प्रति क्विंटल ४००० रुपयांपर्यंत खाली आला आहे.>बंपर उत्पादन आले अंगाशीलसूण, सोयाबीन, गहू , चना यासारख्या पिकांचे उत्पादन राजस्थानात वाढल्याने त्यांचे भाव पडत आहेत. वाढलेल्या उत्पादनामुळे शेतकºयांना योग्य हमीभाव मिळविण्यात अडचणी येत आहेत. हरभरा, लसणाच्या किमती दोन वर्षांपूर्वी ९ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचल्या होत्या. आॅक्टोबर २०१८ मध्ये हरभरा ४१०० रुपये क्विंटल तर लसूण २३०० रुपये प्रति क्विंटल असे घसरले होते. यामुळे २०१८ मध्ये राजस्थानातील हाडोती भागात लसणाच्या पाच उत्पादक शेतकºयांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूक