शाहू महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक
By admin | Published: January 06, 2017 2:13 AM
भोगावती : राधानगरी येथे धरणस्थळावर बसविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची राधानगरीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावागावांतील आबालवृद्धांचा गर्दीचा महापूर लोटला होता. सर्वजण नतमस्तक होऊन महाराजांवर पृष्पवृष्टी करीत होते.
भोगावती : राधानगरी येथे धरणस्थळावर बसविण्यात येत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची राधानगरीपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर गावागावांतील आबालवृद्धांचा गर्दीचा महापूर लोटला होता. सर्वजण नतमस्तक होऊन महाराजांवर पृष्पवृष्टी करीत होते.भोगावती नदीवरील धरणाची निर्मिती शाहू महाराजांनी केली. येथे शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून शाहू स्मारक बांधले जात आहे. त्या ठिकाणचा भूमिपूजन कार्यक्रम बुधवारी सकाळी पार पडला आहे. मात्र, त्या ठिकाणी पुतळा उभा के ला जाणार आहे त्याचा शुभारंभ गुरुवारी भोगावती (ता. करवीर) येथून भव्य मिरवणुकीने झाला. येथील शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घातल्यानंतर येथून मिरवणुकीला सुरुवात झाली.शाहू महाराजांचा जयजयकार, फटाक्यांची आतषबाजी, आबालवृद्धांची पुष्पवृष्टी यामुळे या मिरवणुकीत वेगळाच रंग भरला होता. गावागावांत सुवासिनींनी ओवाळणी केली. कौलव, बरगेवाडी, घोटवडे, सिरसे, आमजाई व्हरवडे, आदी गावांच्या सरपंचांनी गावच्यावतीने हार अर्पण केला. या मिरवणुकीत जि. प.चे शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, माजी संचालक उदयसिंह पाटील-कौलवकर, विजयसिंह डोंगळे, माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, धैर्यशील पाटील-कौलवकर, धिरज डोंगळे, प्रा. पांडुरंग पाटील, सुशील पाटील-कौलवकर, अशोकराव पाटील, राजू कवडे, मधुकर वरुटे, व्ही. आर. चरापले, रणजित पाटील, आदी उपस्थित होते.---विद्यार्थ्यांचा उत्साही प्रतिसादशाहू महाराजांच्या पुतळा मिरवणुकीसाठी शालेय विद्यार्थी शाहूमय झाले होते. बर्याच विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांचा वेष परिधान केला होता, तर लहान मुली साड्या परिधान करून होत्या. यावेळी कौलव येथील शिवराज विद्यालय, बी. के. पाटील हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, केंद्रशाळा कौलव आणि गणपतराव डोंगळे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग नोंदविला होता.