नवी दिल्ली : निवडणूक मतदान यंत्रे (ईव्हीएम) ही दणकट व कोणताही फेरफार करता न येणारी आहेत. एवढेच काय या यंत्रांचे उत्पादन करतानाही कारखानदार त्यांच्यात हातचलाखी करू शकत नाही, असे निवडणूक आयोगाने रविवारी म्हटले. ईव्हीएम विश्वास ठेवण्यास योग्य नसल्याच्या आरोपांना आयोगाने याद्वारे फेटाळले आहे. आयोगाने नुकतीच दोन निवेदने प्रसिद्धीस देऊन या यंत्रांचे समर्थन केले आहे. नेहमी विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे अशा स्वरुपात आयोगाने आपली बाजू मांडली आहे. ईव्हीएम हॅक केले जाऊ शकते का? आयोगाने अजिबात नाही, असे उत्तर दिले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
ईव्हीएममध्ये उत्पादकही बदल करू शकत नाही
By admin | Published: April 10, 2017 12:52 AM