शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

आदित्य ठाकरेंनी म्हटलं कैसे हो! तेजस्वी यादवांनी केले स्वागत; बिहार दौऱ्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 5:21 PM

बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई - युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे एक दिवसीय बिहार दौऱ्यावर गेले होते. आदित्य ठाकरेंसोबतशिवसेना खासदार अनिल देसाई, प्रियंका चर्तुवेदी हेदेखील उपस्थित होते. आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू झाल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे बिहारला पोहचताच पटना येथे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी पोहचले. तेव्हा आदित्य यांच्या स्वागतासाठी तेजस्वी यादव स्वत: बाहेर उभे होते. 

आदित्य ठाकरेंची गाडी पोहचल्यानंतर हे दोन्ही नेते आमनेसामने आले. तेव्हा आदित्य यांनी कैसे हो असा प्रश्न तेजस्वी यादवांना केला. तेव्हा तेजस्वी यादव यांनी Very Well, Welcome म्हणत त्यांना घरात घेऊन गेले. त्याठिकाणी या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. पहिल्यांदाच तेजस्वी यादव आणि आदित्य ठाकरे भेटणार त्यामुळे याठिकाणी माध्यमांचीही बरीच गर्दी होती. 

या बैठकीनंतर आदित्य ठाकरे माध्यमांशी बोलले की, आम्ही एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो. कोविड असल्याने आमची भेट झाली नाही. बिहारमध्ये प्रगती होताना दिसतेय. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. बोलणं व्हायचं पण आज भेट झाली. वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. पर्यावरण, विकासाच्या कामावर चर्चा झाली असं त्यांनी सांगितले. 

त्याचसोबत राजकीय चर्चा झाली नाही. परंतु देशातील महागाई, रोजगार याविरोधात तरुणांनी एकटवलं पाहिजे. सर्वांनी एकत्र काम केले तर देशात काहीतरी चांगले घडेल. भेट होणं महत्त्वाचं होतं. आमचे कौटुंबिक संबंध होते. ही मैत्री यापुढेही कायम राहील. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. आता येणे-जाणं होत राहील. तेजस्वी यादव यांना मुंबई भेटीचं निमंत्रण दिले आहे. तेजस्वी यादव लंबी रेस के घोडे आहे असं कौतुक आदित्य ठाकरेंनी केले. 

देशात तरुण नेत्यांची मजबूत फळी उभारणारतेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांच्या मदतीनं राजकीय परिवर्तन केलंय. अशा तरूण नेत्यांना भेटून देशात मजबूत फळी उभारण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे करतायेत. त्यात त्यांना यश मिळतंय. देशातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरेंशी संवाद साधायचा आहे. अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी इतर राज्यातील प्रमुख नेत्यांना आदित्य ठाकरे भेटणार आहे. या देशात समर्थ पर्याय उभं करण्याच्या दृष्टीने ही राष्ट्रीय रणनीती आहे असं खासदार संजय राऊत म्हणाले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेTejashwi Yadavतेजस्वी यादवShiv Senaशिवसेना