शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

संभाव्य मुख्यमंत्र्यांचे प्रोजेक्शन असे बारगळले..!

By admin | Published: July 17, 2014 12:42 AM

मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा

रघुनाथ पांडे, नवी दिल्लीमुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असणाऱ्या जागा भाजपाच्या वाट्याला येण्याची शक्यता नसल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना आधी जास्तीत जास्त आमदार निवडून आणा, मग दिल्लीतून मुख्यमंत्री ठरवू असा चिमटा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काढल्याचे सूत्रांनी सांगितले.भाजपाच्या कोअर समितीसह प्रमुख पदाधिकाऱ्याशी मंगळवारी शहा यांनी राज्याच्या स्थितीबद्दल चर्चा केली. मुख्यमंत्री पदाचे नाव तुर्तास बारगळल्याने, जागा वाढविण्यासाठी हमखास विजयी होऊ शकणाऱ्या भाजपाच्या काही आमदारांना तयार राहण्याचे संकेत शहा यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.राज्यात वातावरण मोदीमय असल्याने भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविली तर पक्ष सत्तेत येऊ शकेल, ही प्रमुख शक्यता पडताळून पाहायची का, असे शहा यांना सांगण्यात आले. असे झाल्यास मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करून लाभ घेता येईल, असेही त्यांना आडून सुचविले गेले. मात्र सत्तेत यायचे असेल तर या शक्यतांवर विचार करू नका, अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करा. ज्यांचे आमदार अधिक असतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल असे आधीच ठरल्याचे शहा यांनी सांगितले. त्यामुळे वाटाघाटीत जागा शिवसेनेच्या पदरात अधिक गेल्या तरी, विजयी किती होतील, यावरच मुख्यमंत्रीपदाचे नाव अवलंबून आहे. २००९ च्या निवडणुकीत भाजपाने ११९ जागा लढविल्या, पैकी ४७ जिंकल्या. शिवसेनेने १६० जागा लढविल्या, पैकी ४५ जिंकल्या. यावेळी भाजपा १२५-१३० जागा मागणार आहे. तर शिवसेनेला १६० जागांवरून १४५ जागांपर्यंत मागे आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. १७ ते २० जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठेवली जात आहे. पण शिवसेना जागा सोडेल का, याप्रश्नाचे उत्तर आज कोणाकडेच नाही. प्रमोद महाजन असताना ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेने बळकावला, तर गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत बोलणी सुरू असताना गुहागर विधानसभा मतदारसंघ ओढून घेतला, त्यामुळे वाटाघाटीच्या यावेळच्या चर्चेत जागा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा नेते शिवसेनेवर उलटणारे अनेक मुद्दे भात्यात भरून नेणार आहेत. शहा यांना सांगण्यात आले, की शिवसेनाकडे ओढा असलेल्या रामदास आठवले यांना राज्यसभा बहाल करताना भाजपाने मदत केली, त्यामुळे राजू शेट्टी यांना भाजपा, तर आठवले व जानकर या मित्रांना शिवसेनेने आपल्या वाट्याच्या जागा द्याव्या, दोन्ही पक्ष ज्या जागा कधीच जिंकू शकले नाहीत, त्या जागांवर यावेळी भाजपाने दावा करावा. त्यामुळे जागांच्या वाटाघाटीत शिवसेना पुढे राहणार असली, तरी प्रत्यक्षात भाजपाचे उमेदवार जास्तीत जास्त विजयी करण्याचे धोरण असणार आहे. ————