युवक काँग्रेसतर्फे चिक्की घोटाळ्याचा निषेध
By admin | Published: June 26, 2015 1:05 AM
सोलापूर : सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेल्या घोटाळ्याचा गुरुवारी निषेध करण्यात आला.
सोलापूर : सोलापूर लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी चिक्की खरेदीत केलेल्या घोटाळ्याचा गुरुवारी निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस निरीक्षक रुत्विज जोशी, लोकसभा युवक अध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश यलगुलवार उपस्थित होते. महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या २0६ कोटी रुपये खर्चाच्या चिक्की घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे व केंद्रीय शिक्षण मंत्री स्मृती इराणी यांनी बोगस पदवीबाबत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री वेगवेगळ्या भानगडीत अडकल्याबद्दल युवक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.