शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

नवरदेवाला दाढी राखण्यास अन् घोड्यावरून वरात काढण्यास मनाई, विवाहाचा खर्च कमी करण्यासाठी अनोखे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:27 AM

विवाहामध्ये अमुक रकमेच्याच वस्तू भेटीदाखल द्याव्यात, असे बंधनही वऱ्हाडी मंडळींवर घालण्यात आले आहे. १९ गावांतील कुमावत समुदायाच्या लोकांनी १६ जूनला एक बैठक घेऊन विवाहाचा खर्च कमी करण्याचे नियम तयार केले.

जयपूर : विवाहावर होणारा अफाट खर्च टाळण्यासाठी राजस्थानमधील पाली जिल्ह्यात कुमावत व जाट समुदायाने काही नियम तयार केले आहेत. त्यानुसार, नवऱ्या मुलाची घोड्यावरून वरात काढण्यात येणार नाही, तसेच नवरदेव दाढी ठेवणार नाही, असे ठरविण्यात आले आहे.विवाहामध्ये अमुक रकमेच्याच वस्तू भेटीदाखल द्याव्यात, असे बंधनही वऱ्हाडी मंडळींवर घालण्यात आले आहे. १९ गावांतील कुमावत समुदायाच्या लोकांनी १६ जूनला एक बैठक घेऊन विवाहाचा खर्च कमी करण्याचे नियम तयार केले.सध्या नवरदेव चित्रविचित्र आकाराची दाढी ठेवतात. त्यामुळे या सोहळ्यातले गांभीर्य कमी होते, यावर कुमावत समाजाच्या नेत्यांचे मत झाले. त्यामुळे लग्नप्रसंगी नवऱ्याने दाढीच ठेवू नये, असा नियम या बैठकीत करण्यात आला.श्रीमंती सजावटीला मज्जावकुमावत समाजाचे नेते लक्ष्मीनारायण टाक यांनी सांगितले की, लग्नामध्ये सजावट, संगीत व अन्य प्रथांवर होणारा प्रचंड खर्च कमी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कोणत्याही विवाहात खूप मोठी सजावट असणार नाही. कोणीही डीजे लावणार नाही. वधुवराला पोशाख किंवा दागिने विशिष्ट रकमेपर्यंतच द्यावे, असे बंधन घालण्यात आले.नियम न पाळल्यास दंडविवाहावरील प्रचंड खर्चाला कात्री लावणार. नियम न पाळणाऱ्यांना दंड आकारण्याचे किंवा अन्य प्रकारची शिक्षा सुनावण्याचा निर्णय  बैठकांमध्ये घेण्यात आला.डीजे, फटाके टाळणार राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील पाच गावातल्या जाट समुदायानेही विवाहांवर कमी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नवऱ्यामुलाची घोड्यावरून वरात न काढण्याचे ठरविण्यात आले आहे. भाकरीवाला गावचे सरपंच आमनाराम बेनीवाल यांनी सांगितले की, नवऱ्या मुलाने दाढी करूनच लग्नमंडपात यावे, फटाके वाजवू नयेत, डीजे असू नये, असे नियम आम्ही तयार केले आहेत. विवाहामध्ये होणारा प्रचंड खर्च गरीब लोकांना परवडत नाही. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानmarriageलग्न