बंगळुरू : भारताने ८२७ अश्लील संकेतस्थळे (पोर्न साईट) बंद केल्याचा हजारो मोबाईल वापरकर्त्यांनी निषेध केला असून, विशेषत: अशा साईटची वार्षिक वर्गणी भरणाऱ्यांनी आमच्यावर अन्याय झाल्याचे म्हटले आहे.पोर्नहबचे तिसºया क्रमांकाचे ग्राहक भारतात आहेत (अमेरिका आणि ब्रिटनचा अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक आहे). पोर्न साईटस्वरील बंदी मागे घेतली जावी यासाठी पोर्नहबने पोर्नहब डॉट नेट ही मिरर साईट तयार केली आहे. बिहॅन्स डॉट नेटसारख्या इतर साईटस्नी आपल्या ग्राहकांना मोबाईल अॅप्स डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे.एअरटेल, रिलायन्स, जिओ आणि व्होडाफोनच्या कस्टमर केअर सेंटरकडे त्यांच्या ग्राहकांचे असंख्य फोन आले. हॅशटॅग पोर्नहब या नावाखाली टिष्ट्वटरवर हजारो टष्ट्वीट धडकले आहेत. पोर्नवरील बंदी ही भारतात नेट न्यूट्रॅलिटीच्या विरोधात असून कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ग्राहकाला भेदभावाची वागणूक देण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असे मोबाईल युजर्सचे म्हणणे आहे.सरकारने चाईल्ड पोर्न, बलात्कार आणि बीडीएसएमवर (बाँडेज, डिसिप्लीन, सॅडीझम आणि मॅसोचिझमसारखे लैंगिक व्यवहार) कठोर कारवाई करावी; परंतु, पोर्नहब आणि एक्सव्हिडिओज डॉट कॉमसारख्या प्रसिद्ध संकेतस्थळांवर कारवाई करू नये कारण त्यांच्यावरील साहित्य हे साधे सरळ असते, असे युजर्सचे म्हणणे आहे.(वृत्तसंस्था)कायदा नसताना बंदी का?अशीच भावना पोर्नहबचे उपाध्यक्ष कोरे प्राईस यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, पोर्नहबसारख्या मोठ्या साईटस्वरच बंदी घालण्यात आली असून, ज्या जोखमीच्या साईटस्वर बेकायदा साहित्य (इल्लीगल कंटेटस्) आहेत त्या खुल्या आहेत.भारतात बंद खोलीत पोर्न बघण्यास व अश्लील चित्रपट, फोटो, पुस्तके बघण्यास व वाचण्यास बंदी असलेला कायदा नाही. देशातील गंभीर प्रश्नावर भारत सरकारला उत्तर सापडलेले नाही त्यामुळे आमच्यासारख्यांच्या साईटस्ला बळीचा बकरा बनवण्यात आला आहे, असेही प्राईस म्हणाले.
पॉर्न साईट बंदीचा युजरकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2018 5:28 AM