Project Cheetah: PM मोदींच्या वाढदिवशी भारताला मिळणार चित्ते, विशेष विमान नामिबीयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 03:03 PM2022-09-15T15:03:51+5:302022-09-15T15:05:06+5:30
Project Cheetah: भारतातून नामशेष झालेला चित्ता 70 वर्षानंतर भारतात धावताना दिसणार आहे.
PM Narendra Modi's Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबर रोजी वाढदिवस असून, हा दिवस यंदा खास असणार आहे. या दिवशी देशातून नामशेष झालेला चित्ता भारतात परतणार आहे. 70 वर्षांनंतर भारतात चित्ते धावणार आहे, यासाठी नामिबियाला भारताचे विशेष विमान गेले आहे. या विमानाद्वारे नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले जाणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात या चित्त्यांना सोडले जाणार आहे.
विमानाला चित्त्याचा रंग
या चित्त्यांना घेण्यासाठी नामिबियात पोहोचलेल्या विशेष विमानाला सुंदर अशा चित्त्याच्या रंगात रंगवण्यात आले आहे. या विशेष विमानाद्वारे नामिबियातून चित्ते आधी जयपूरला आणि तेथून हेलिकॉप्टरद्वारे मध्य प्रदेशातील कुनो-पालपूर राष्ट्रीय उद्यानात आणले जातील. पीएम नरेंद्र मोदी त्यांच्या वाढदिवशी हे चित्ते देशाला सुपूर्द करतील.
A special bird touches down in the Land of the Brave to carry goodwill ambassadors to the Land of the Tiger.#AmritMahotsav#IndiaNamibiapic.twitter.com/vmV0ffBncO
— India In Namibia (@IndiainNamibia) September 14, 2022
70 वर्षांनंतर भारतात चित्ते धावणार
नामिबियातील भारतीय उच्चायुक्ताने ट्विटरवर या विशेष विमानाचे फोटो शेअर आहेत. विशेष म्हणजे, भारतात चित्ते आणण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. 2009 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारांसोबत आंतरराष्ट्रीय चित्ता तज्ञांची बैठक झाली. 2010 मध्ये भारतातील 10 संभाव्य क्षेत्रांचे सर्वेक्षण भारतीय वन्यजीव संस्थेने चित्ता पुनर्संचयनासाठी केले होते. या संभाव्य 10 स्थळांपैकी कुनो अभयारण्य (सध्याचे कुनो नॅशनल पार्क, श्योपूर) सर्वात योग्य असल्याचे आढळले.