हरीश गुप्तानवी दिल्ली : केंद्र सरकार राबवत असलेल्या पायाभूत सुविधांसाठीचे १७३६ प्रकल्प १५० आणि त्यापेक्षा जास्त कोटी रुपये खर्चाचे असून ते सगळे रखडले आहेत. यापैकी ४४९ प्रकल्पांचा खर्च हा जास्त झाला असून ५४७ प्रकल्प वेळेत पूर्ण झालेले नाहीत. २०८ प्रकल्प तर त्यांचे वेळेचे नियोजन आणि खर्च याबाबतीत खूप पुढे गेले आहेत.
एकूण १७३६ प्रकल्प एक तर वेळापत्रक पाळू शकले नाहीत, की त्यांचा वाढता खर्च थांबवू शकले नाहीत. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने माहिती गोळा करून ती ऑनलाईन कॉंम्प्युटराईज्ड् मॉनिटोरिंग सिस्टिमवर उपलब्ध करते. ही बाब बुधवारी संसदेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी आणि नियोजनमंत्री राव इंदरजित सिंह यांनी सांगितली.
पंतप्रधानांचे व्यक्तिश: लक्ष असतानाही...
धक्कादायक बाब म्हणजे १७३६ पैकी रखडलेल्या ५४७ प्रकल्पांचा खर्च हा १५० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा आहे.त्यांनी हा खर्च दाखवला आहे. या रकमेत १५० कोटी रुपयांच्या खालच्या प्रकल्पांचा खर्च आणि त्यांना झालेल्या विलंबाचा समावेश नाही. मोदी १५० कोटी रुपये खर्चाच्या प्रत्येक प्रकल्पावर व्यक्तिश: लक्ष ठेवून असतानाही ही परिस्थिती आहे.