शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

अभय मंत्री, श्याम चांडक, नीरज धोटे यांना न्यायाधीशपदी बढती द्या; SC च्या कॉलेजियमकडून १३ नावांची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 8:29 AM

न्या. अभय मंत्री हे जालना जिल्ह्यातील अंबडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी न्या. संतोष बोरा यांच्यासोबत औरंगाबाद खंडपीठात सुमारे १३ वर्षे वकिली केली आहे. सध्या ते ठाणे येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत. 

 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १३ न्यायिक अधिकाऱ्यांची विविध उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करावी अशी शिफारस केली आहे. महाराष्ट्रातील अभय मंत्री, श्याम चांडक, नीरज धोटे या तीन प्रधान जिल्हा न्यायाधीशांना मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी बढती द्यावी, असे कॉलेजियमने म्हटले आहे.

न्या. अभय मंत्री हे जालना जिल्ह्यातील अंबडचे मूळ रहिवासी आहेत. त्यांनी न्या. संतोष बोरा यांच्यासोबत औरंगाबाद खंडपीठात सुमारे १३ वर्षे वकिली केली आहे. सध्या ते ठाणे येथे प्रधान जिल्हा न्यायाधीश आहेत. 

शालिंदर कौर, रवींद्र दुदेजा या न्यायिक अधिकाऱ्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची कॉलेजियमने शिफारस केली आहे. एम. बी. स्नेहलता, जॉन्सन जॉन, जी. गिरीश, सी. प्रदीपकुमार आणि पी. कृष्णकुमार या पाच न्यायिक अधिकाऱ्यांची केरळ उच्च न्यायालयात, तर न्यायिक अधिकारी विमल व्यास यांची गुजरात उच्च न्यायालयात, न्यायिक अधिकारी विश्वजित पालित, सव्यसाची दत्ता पुरकायस्थ यांची त्रिपुरा उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नियुक्ती करावी, अशी  शिफारस केली. 

इतर न्यायालयांसाठी सुचवले नाववकील रवींद्रकुमार अग्रवाल यांची छत्तीसगड उच्च न्यायालयात तसेच हरिनाथ नुनेपल्ली, किरणमयी मांडवा, सुमती जगदम आणि न्यापथी विजय या वकिलांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करावी, असे सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने म्हटले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय