शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

शैक्षणिक धोरणामध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन

By admin | Published: June 19, 2016 4:53 AM

केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात येत असलेल्या नव्या धोरणात शाळांमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे तयार करण्यात येत असलेल्या नव्या धोरणात शाळांमध्ये योगाभ्यासाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालयातील शालेय शिक्षण आणि साक्षरता सचिव सुभाषचंद्र खुंटिया यांनी शनिवारी पहिल्या योग आॅलिम्पियाडच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती दिली. या आॅलिम्पियाडमध्ये २२ राज्यांमधील ३५० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशभरातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये या प्राचीन विद्येचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने एनसीईआरटी परिसरात या तीन दिवसीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. खुंटिया म्हणाले, ‘नव्या धोरणात योगाभ्यासाला महत्त्व असणार आहे. योग म्हणजे व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक संतुलन राखण्यासोबतच सुदृढ आरोग्य देणारी कला आहे. त्या अनुषंगाने हा निर्णय झाला असून, विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी योगाभ्यासाचे धडे मिळावेत, म्हणून दरवर्षी हे आॅलिम्पियाड भरविण्यात येणार आहे.’ एनसीईआरटीने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी योगाभ्यासाची पुस्तके प्रकाशित केली असून, इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत केंद्रीय अभ्यासक्रमाचा तो भाग राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. खुंटिया म्हणाले, ‘मोठ्या शाळांमध्ये प्रशिक्षित योग शिक्षक आहेत, परंतु ज्या शाळांमध्ये ते उपलब्ध नाहीत, तेथील शारीरिक शिक्षण विभागाच्या शिक्षकांना योगाभ्यास संस्थांच्या मदतीने प्रशिक्षण दिले जात आहे.’ ‘योगाभ्यासाने एक चांगला माणूस आणि नागरिक निर्माण करण्यास मदत होऊ शकते,’ असे मत राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एनसीईआरटी) संचालक ऋषिकेश सेनापती यांनी व्यक्त केले. (वृत्तसंस्था)