लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाकडून जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले. याची सुनावणी ८ आठवड्यांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असून ताेपर्यंत १७ मे राेजी दिलेले निर्देश जारी राहतील, असेही स्पष्ट केले. सर्वेक्षणाच्या अहवालातील ठराविक भाग फाेडल्याबाबततीव्र नाराजी व्यक्त करून हे राेखण्याचे निर्देश दिले.
अहवाल फोडल्यावरून व्यक्त केली तीव्र नाराजी
विशेष आयुक्तांनी सर्वेक्षण अहवाल सादर केला हाेता. त्यात छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण हाेते. मात्र, काही भाग फाेडल्याचा आक्षेप मुस्लिम पक्षकारांनी घेतला. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.