मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी, मुंबईपोलिसांचा एक चमू भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांना समन देण्यासाठी दिल्लीत पोहोचला आहे. मुंबईचे पायधूनी पोलीस हे समन घेऊन पोहोचले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नुपूर शर्मा यांना यापूर्वी त्यांच्या ईमेलवरही समन पाठवण्यात आले होते. आता पोलिसांचा एक चमू त्यांना समनची कॉपी देण्यासाठी दिल्ली येथे पोहोचला आहे.
नुपूर शर्मा यांना पाठवण्यात आलेल्या समनमध्ये मुंबईच्या पायधूनी पोलिसांनी, त्यांना 25 जूनला 11 वाजता जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. रजा अकादमीच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.
भाजपच्या माजी प्रवक्ता नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. वाद वाढल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. भारताशिवाय अनेक इस्लामिक देशांनीही त्यांच्या वक्तव्याचा विरोध केला होता. त्याच्यावर अनेक राज्यांत एफआयआर दाखल करण्यात आले होते.
नुपूर यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल -नुपूर शर्मा यांना मुंब्रा पोलिसांनीही समन बजावले होते. पोलिसांनी त्यांना 22 जूनला हजर होण्यास सांगितले आहे. मुंब्रा येथे मोहम्मद गुफरान खान नावाच्या शिक्षकाने नुपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याशिवाय, एक तक्रार ठाण्यातही दाखल करण्यात आली आहे.