नवी दिल्ली : आपल्या पाचव्या पिढीची ग्रायपेन ही लढाऊ विमाने भारतात तयार करणे आणि त्यासोबतच भारताला या विमानाचे तंत्रज्ञानही देण्याचा प्रस्ताव स्वीडनच्या ‘साब’ या संरक्षण साहित्याचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीने दिला आहे. ‘साब’ला २०११ मध्ये भारतीय वायुसेनेसाठी ‘मिडीयम मल्टीरोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट’चा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळविण्यात अपयश आले होते. हे कंत्राट डसॉल्ट एव्हिएशन या फ्रान्सच्या कंपनीला मिळाले होते. ‘राफेल’च्या ३६ विमानांमुळे भारतीय वायुसेनेच्या ताफ्याला बळकटी मिळणार नाही. वायुसेनेला आणखी लढाऊ विमानांची आवश्यकता पडेल, असे ‘साब’चे मत आहे. ‘साब’ने भारतात केवळ एक उत्पादन प्रकल्प स्थापन करण्याचाच प्रस्ताव दिलेला नाही तर पुढची १०० वर्षेपर्यंत विमान क्षेत्राच्या विकासात मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे. एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी या विमानांचा विकास व डिझाईनचे काम पाहात आहे.
भारतात विमाने बनविण्याचा प्रस्ताव
By admin | Published: December 20, 2015 11:11 PM