नाशिक : निफाड न्यायालयात सुरू असलेली फारकतीची केस चालविण्यासाठी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी करणारे अभियोक्ता तथा कायदेशीर सल्लागार ॲड़ शरद छबूराव वाघ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले़लाचलुचपत विभागामार्फत पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार तक्रारदाराची निफाड न्यायालयात फारकतीची केस (६० / २०१४) दाखल आहे़ या केससाठी न्यायालयाने तक्रारदाराच्या वतीने ॲड़ शरद छबूराव वाघ या अभियोक्त्याची नेमणूक केली आहे़ असे असताना ॲड़ वाघ यांनी केस चालविण्यासाठी १००० रुपयांची मागणी केल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनुसार एसीबीच्या अधिकार्यांनी सोमवारी (दि़२९) सायंकाळी सापळा रचून निफाड न्यायालय आवारातील बिल्डिंग नंबर १ मधील ३०८ रुममध्ये तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत निफाड पोलीस ठाण्यात ॲड़ वाघ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)
निफाड न्यायालयातील अभियोक्ता एसीबीच्या जाळ्यात (सीडीसाठी)
By admin | Published: February 29, 2016 11:32 PM