हैदराबाद : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात असणाऱ्यांनी घराबाहेर तिरंगा ध्वज फडकावून काळ्या कायद्याचा निषेध करावा, असे आवाहन एआयएमआयएम या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. त्यामुळे भाजपला जनतेच्या खºया भावना कळतील, असेही ते म्हणाले.
हैदराबाद येथील एका जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, एनआरसीच्या विरोधात सुरू असलेला लढा हा केवळ मुस्लिमांचा नाही तर दलित, अनुसूचित जाती-जमातीतील लोकांचाही आहे. जनतेने राज्यघटना बचाव दिन पाळायला हवा. मी देशद्रोही असल्याचे आरोप केले जातात. मी जन्माने व कर्माने भारतीय आहे हे कोणीही विसरू नये असेही त्यांनी सांगितले.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने नेमली चौकशी समितीअलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये १५ व १६ डिसेंबर रोजी झालेल्या हिंसक निदर्शनांची चौकशी करण्यासाठी या विद्यापीठाने छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व्ही. के. गुप्ता यांची एक सदस्यीय समिती नेमली आहे. कुलगुरू तारिक मन्सूर यांनी सांगितले की, हिंसक निदर्शने कोणत्या कारणांमुळे झाली याची कारणे उजेडात आलीपाहिजेत.
तृणमूल नेत्यांच्या लखनौ दौºयास परवानगी नाहीच्नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात हिंसक आंदोलन सुरू असलेल्या उत्तर प्रदेशचा दौरा करण्यास तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना परवानगी देणार नाही असे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सांगितले. तृणमूल नेत्यांच्या लखनऊ भेटीमुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले.च्लखनौसह उत्तर प्रदेशमध्ये संचारबंदी लागू आहे. परवानगी नसतानाही जर तृणमूल काँग्रेसचे नेते लखनौला आले तर त्यांना विमानतळावरूनच परत पाठविण्यात येईल असेही ओ. पी. सिंह यांनी सांगितले.