नवी दिल्ली : लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. विरोधी पक्षांनी राफेल विमान खरेदी घोटाळ्याविरोधात आज संसदेबाहेर आंदोलन केले. तसेच राज्यसभेतही कामकाजावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्याने महत्वाच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा होण्याची शक्यता आहे. तिहेरी तलाक विधेयकाच्या सुधारित मसुद्यावर आज चर्चा होणार असून ते मंजुर होण्याची शक्यता आहे. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी राफेल विमान खरेदी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आज सकाळी काँग्रेस, सीपीआय, आरजेडीसह विरोधीपक्षांनी संसदेबाहेर आंदोलन केले. यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला होता. तिहेरी तलाक विधेयकावर सोनिया गांधी यांनी सांगितले की, यावर पक्षाची भुमिका स्तष्ट आहे. आपण यावर अधिक बोलणार नाही.