फ्रान्सविरोधात निदर्शन : साध्वी प्रज्ञा भडकल्या, म्हणाल्या - भोपाळमध्ये 'गद्दारां'ची कमी नाही
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 30, 2020 05:53 PM2020-10-30T17:53:46+5:302020-10-30T17:56:49+5:30
देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा : साध्वी प्रज्ञा (Bhopal, bjp, sadhvi pragya thakur)
भोपाळ - फ्रान्समध्ये नुकत्याच झालेल्या घटनेसंदर्भात राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर, जगभरात निदर्शने होत आहेत. मॅक्रॉन यांनी केलेल्या टिप्पणीविरोधात भोपाळमध्ये गुरुवारी शेकडो लोकांनी निदर्शन केले. सातत्याने आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या निदर्शनांवरून भडकल्या आहेत.
खासदार साध्वी प्रज्ञा म्हणाल्या, "भोपाळमध्ये अशा 'गद्दारां'ची कमी नाही. हे लोक देश बर्बात करण्यात लागले आहेत. देशात अशा लोकांविरोधत नियम तयार करायला हवेत आणि अशा लोकांना लगाम लागायला हवा." एवढेच नाही, तर दहशतवादी कारवाया पसरवणारे लोक अधर्मी आहेत. केवळ फ्रान्सच नाही, तर संपूर्ण जगात जेथे-जेथे असे लोक आहेत, ते देश लोकांच्या संरक्षणासाठी कायदा तयार करतील, असेही साध्वी म्हणाल्या.
"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...
साध्वी प्रज्ञा सींह यांनी प्रश्न उपस्थित केला, की "हे लोक चीनमध्ये का तोंड वर काढू शकत नाहीत? जे नियम चीन तयार करतो, त्याच नियमांवर या लोकांना चालावे लागते. भारतानेही असे नियम तयार करायला हवेत." एवढेच नाही, तर "दहशतवादी कोण असतो? हाच वर्ग का असतो? हा वर्ग जेथे-जेथे आहे, या अधर्मी लोकांना तेथे-तेथे शिक्षा मिळत आहे," असेही साध्वी प्रज्ञा म्हणाल्या.
'नेहमी-नेहमी एकच समाज का आग लावतो' -
यावेळी बाबा रामदेव यांनी देशातील मुस्लिमांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, 'नेहमी-नेहमी एकाच समाजाचे लोक का आग लावायला सुरुवात करतात? मग हिंदूही विचार करतील, की आगच लावावी. आपण आपल्या मान्यतांवर विश्वास ठेवा, मात्र, संपूर्ण जगावर तर हे थोपू शकत नाही. स्वतःप्रति दृढ रहा आणि इतरांप्रति उदार रहा. स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता ठेवा'. रामदेव म्हणाले, ध्रुवीकरणाचे घृणास्पद राजकारण संपायला हवे. यावर लगाम लागायला हवा.'
'धार्मिक उन्मादामुळेच युद्ध होतात' -
रामदेव म्हणाले, धार्मिक उन्मादामुळेच जग भरात युद्धे होतात. 'आजवर जगभरात झालेल्या लढायांचे सर्वात मोठे कारण हे धार्मिक उन्माद आहे. धार्मिक दंगे आहेत.' यावेळी, पैगंबर मोहम्मद, यशू ख्रिस्त, गुरुनानक देव जी, भगवान महावीर, बुद्ध, भगवान राम, कृष्ण, शिव, कुठल्याही महापुरुषाने धार्मिक कट्टरतेसंदर्भात भाष्य केले आहे? असा सवाल करत, कधीच नाही,' असे बाबा रामदेव म्हणाले. या सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे, 'सर्व मानुष्य एकसारखेच आहेत. हिंसा तर अत्यंत दूरची गोष्ट, हे म्हणतात, की कधीही कुणाचे मन दुखवू नका. मग हा काय तमाशा सुरू आहे? कशासाठी निदर्शन होत आहे?'
"वेदनादायक शिक्षा मिळेल..."; फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासंदर्भात झाकीर नाईकने ओकली गरळ