बंगळुरू - काही दिवसांपूर्वी असदुद्दीन ओवैसींच्या सभेत अमूल्या लिओना या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा, असे विधान कर्नाटकसरकारमधील मंत्री बी.सी. पाटील यांनी केले आहे. तसेच यासंदर्भात आपण मोदींना आवाहनही करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्यास अशी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्यासाठी एक केंद्रीय कायदा असावा, असे बीसी पाटील यांनी सांगितले. यासंदर्भात विचारणा केली असता बीसी पाटील म्हणाले की, ''केंद्र सरकारने देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांवर गोळ्या झाडण्याची तरतूद असणारा कायदा केला पाहिजे. देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणार आहे.''गेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता. या सभेला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हेसुद्धा उपस्थित होते. ओवैसी यांनी अमूल्या हिच्या घोषणाबाजीला विरोध केला होता. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. तसेच तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, बीसी पाटील यांनी अशा लोकांना त्वरित गोळ्या घातल्या पाहिजेत, अशी मागणी केली आहे. केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनीही देशविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना कुठल्याही प्रकारची दयामाया दाखावली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
पाकिस्तान समर्थकांना गोळ्या घालण्याची कायद्यात तरतूद करा, भाजपा मंत्र्याची मुक्ताफळे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 11:24 AM
B. C. Patil : पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा
ठळक मुद्दे पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणाऱ्यांवर दिसताक्षणी गोळ्या झाडण्याचा कायदा करण्यात यावा,देशद्रोह्यांना गोळ्या झाडण्याची तरतूद असलेला केंद्रीय कायदा लागू झाला पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींना करणारगेल्या आठवड्यात सीएए-एनआरसीविरोधात आयोजित करण्यात आलेल्या सभेवेळी अमूल्या लिओना नावाच्या तरुणीने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन गोंधळ उडवून दिला होता