शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

CAAमध्ये नागरिकत्व हिरावण्याची तरतूद? सिद्ध करून दाखवा; अमित शाहांचे राहुल गांधींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 4:23 PM

म्हणून देशात लागून केला नागरिकत्व दुरुस्ती कायदा...

सिमला -  नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून सध्या देशातील राजकारण तापलेले आहे. दरम्यान, यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज पुन्हा एकदा काँग्रेस आणि राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्याकांचे नागरिकत्व काढून घेतले जाणार अशी अफवा काँग्रेस आणि कंपनी पसरवत आहे. मात्र राहुल गांधीजी मी तुम्हाला आव्हान देतो की या कायद्यात कुठेही कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद आहे का? हे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान अमित शाह यांनी दिले आहे. राहुल गांधींवर घाणाघाती टीका करताना अमित शाह म्हणाले की, ''मी देशातील सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करतो की, सर्वप्रथम नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समजून घ्या आणि नंतर इतरांनाही समजावून सांगा. नाहीतर खोटारडेपणा आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण करणारे राजकीय पक्ष आपल्या व्होटबँकेच्या राजकारणासाठी आपल्याला एकमेकांविरोधात असेच लढवत राहतील.''

  यावेळी नागरिकत्व दुरुस्ती कायदा का लागू केला याचेही कारण अमित शाह यांनी सांगितले. 1950 मध्ये नेहरू आणि लियाकत यांच्यात एक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देश आपापल्या देशातील अल्पसंख्याकांचे रक्षण करतील, मात्र लाखो-कोट्यवधी निर्वासितांची कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळेच हा कायदा आणावा लागला आहे, असे शाह यांनी सांगितले. तसेच जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्यात आल्याने आता काश्मीरमध्ये तिरंगा डौलाने फडकत आहे, असेही अमित शाह यांनी सांगितले.  दरम्यान, राहुल गांधी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करताना हा कायदा असंवैधानिक असून, एनआरसी आणि एपीआर हे गरीब नागरिकांवर कर आकारण्यासारखे आहेत, असा टोला लगावला आहे.   

टॅग्स :Amit Shahअमित शहाRahul Gandhiराहुल गांधीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliticsराजकारण