शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 10:23 AM

पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देपंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली.मुलाच्या वडिलांनी  बँक अकाउंटमधून 50,000रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.पैशातून पबजीसाठी गेमिंग पॅडसह पबजी मोबाइल स्क्रीन आणि गेमिंग अ‍ॅक्सिसरिज खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली.

जालंधर - पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली आहे. जालंधरमध्ये ही घटना घडली आहे. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे. 

मुलाच्या वडिलांनी  बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांच्या अकाऊंटमधून पैसे चोरीला गेले. मात्र त्यांना त्याबाबत मोबाइलवर कोणताही ओटीपी आणि ट्रान्झॅक्शनचा मेसेज आला नाही. मग पैसे खात्यातून गेले कसे?, असा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी सायबर सेलकडे हे प्रकरण सोपवल्यानंतर या प्रकरणाचा उलघडा  झाला. मुलाने त्याच्या मित्राच्या पेटीएम खात्यावरून पबजीसाठीच्या साहित्याची खरेदी केली. नंतर वडिलाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी मेसेज डिलीट केला. पेटीएममधून पैसे गेले असून या पैशातून पबजीसाठी गेमिंग पॅडसह पबजी मोबाइल स्क्रीन आणि गेमिंग अ‍ॅक्सिसरिज खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.  आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली आहे. 

PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र'PUBG' या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने काही दिवसांपूर्वी केली होती.  मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं. PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटले होते. 

'तो' सलग 10 दिवस PUBG खेळला, अन्...सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.  

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमPunjabपंजाबPoliceपोलिस