शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

लोकप्रशासन, राज्यशास्त्र विषय एकच

By admin | Published: June 08, 2017 12:20 AM

लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे विषय प्रासंगिक आणि समान आहेत

यमुनानगर : लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे विषय प्रासंगिक आणि समान आहेत, असा निर्णय पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिला. या दोन्ही विषयांची पात्रता असलेले विद्यार्थी महाविद्यालये आणि विद्यापीठांत वरील दोन्ही विषयांच्या प्राध्यापकपदासाठी अर्ज करू शकतात व त्यासाठी निवड होण्याची पात्रताही त्यांच्यात आहे, असे या खंडपीठाने एक न्यायमूर्तींच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देताना स्पष्ट केले. निर्णयाचा अर्थ असा की अर्जदाराकडे लोकप्रशासनात पदव्युत्तर पदवी, नेट व पीएचडी आहे तरी तो राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापकपदासाठी पात्र आहे. जर अर्जदार राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवीधर, नेट किंवा पीएचडीधारक असेल, तर त्याच्याकडे लोकप्रशासन विषयाच्या प्राध्यापकपदासाठीची पात्रता आहे.लोकप्रशासन आणि राज्यशास्त्र हे विषय वेगवेगळे आहेत, असे समजून काही लोकांनी न्यायालयात दाद मागितली होती; परंतु डॉ. युद्धवीर सिंह व डॉ. उदयभान सिंह यांनी वेगवेगळ््या याचिकांच्या माध्यमांतून हे दोन्हीही विषय समान आहेत, असे उच्च न्यायालयाला सांगितले होते. एक दुसऱ्याच्या अभ्यासक्रमांत महाविद्यालये आणि विद्यापीठांत ते शिकवले जातात. >यूजीसीनेही एकच मानलेडॉ. उदयभान म्हणाले की, ‘युजीसीने या दोन्ही विषयांना समान समजून शैक्षणिक पदे, संशोधन व प्रशिक्षण आदीबाबतीत समान मानले आहे.’ उच्च न्यायालयाच्या ताजा निर्णयाने केवळ प्रदेशातीलच नव्हे, तर देशभरातील या दोन्ही विषयांच्या विद्यार्थ्यांत आनंद व्यक्त होत आहे. कारण आता ते दोन्ही विषयांसाठी अर्ज करून शिक्षण क्षेत्रात आपले करिअर करू शकतात, असे ते म्हणाले.