शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
2
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
3
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
4
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
5
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
6
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
7
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
8
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
9
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
10
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर
11
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
12
IND vs NZ : भारताची आपल्या घरात 'कसोटी' तरी बुमराहला का विश्रांती? BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
13
गुरु-शुक्राचा राजयोग: ९ राशींना सुखकर, दिवाळीनंतरही लाभ; उत्पन्न वाढ, नवीन नोकरीची संधी!
14
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
15
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
16
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
17
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
18
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
19
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
20
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार

प्रादेशिक माध्यमांमुळे पत्रकारितेत अधिक परिपक्वता; संजय बारू यांचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 9:09 PM

लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

नवी दिल्ली: काँग्रेस नेते डॉ. शशी थरूर यांच्या हस्ते आज(30मे) लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या ‘रिंगसाइड- अप, क्लोज ॲण्ड पर्सनल ऑन इंडिया ॲण्ड बियॉण्ड’ या नवीन पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. रफी मार्ग, नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या स्पीकर हॉलमध्ये पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचे सल्लागार आणि लेखक डॉ.संजय बारू यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. संजय बारू म्हणाले की, प्रादेशिक माध्यमांमुळे पत्रकारितेत अधिक परिपक्वता येते आणि ती तुलनेने अधिक केंद्रित असते. आजही प्रादेशिक माध्यमे खूप चांगले काम करत आहेत. संजय बारू हे स्वतः महाराष्ट्रातून येतात. याचा संदर्भ देत ते म्हणाले की, मी तेलंगतू आलो आहे आणि विजय दर्डा विदर्भातून आले आहेत, दोन्ही ठिकाणे भारताची विविधता दर्शवतात.

लोकमत मीडिया ग्रुपच्या एडिटोरियल बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांचे 'रिंगसाइड-अप, क्लोज आणि पर्सनल ऑन इंडिया अँड बियॉंड' हे नवीन पुस्तक त्यांच्या साप्ताहिक लेखांचे संकलन आहे. 2011 ते 2016 दरम्यान लोकमत मीडिया ग्रुप आणि देशातील इतर प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक दैनिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत.

'रिंगसाइड'मध्ये विज्ञान, पर्यावरण, अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक विकास, क्रीडा, कला, संस्कृती, परराष्ट्र धोरण आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर संशोधन केलेले लेख आहेत. यामध्ये भारत आणि जगाच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या प्रख्यात व्यक्तींवर केलेली भाष्य देखील आहेत.

प्रसिद्ध अँकर, सल्लागार संपादक, इंडिया टुडे टेलिव्हिजन राजदीप सरदेसाई यांनी पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. विजय दर्डा यांच्याशी पुस्तकावर चर्चा केली. या चर्चेतून श्रोत्यांना पुस्तकाची निर्मिती आणि लेखक विजय दर्डा यांच्या अनुभवांची ओळख झाली. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्लाही उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Dardaविजय दर्डाLokmatलोकमतdelhiदिल्लीShashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेस