Puducherry election results 2021 updates: पुदुच्चेरीमध्ये ६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजल्यापासून पुदुचेरीत कोरोना नियमांचं पालन करत मतमोजणीला सुरूवात झाली. पुदुच्चेरीत ऑल इंडिया एनआर काँग्रेस-भाजप आणि काँग्रेस-द्रमुक आघाडीमध्ये मुख्य सामना रंगला आहे, सुरूवातीच्या कलांमध्ये एनडीए १० जागांवर तर काँग्रेस आघाडी ५ जागांवर पुढे आहे. Puducherry election results 2021 Live updates: Counting begins NDA leads in early counting पुदुच्चेरीत मतमोजणीसाठी १३८२ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे याशिवाय ४०० पोलिसही तैनात करण्यात आले आहे. सध्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थिती निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करत ही मतमोजणी पार पडत आहे. यादरम्यान उपस्थित असणाऱ्या एजंट्सना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये काँग्रेसनं १५ जागांवर विजय मिळवत डीएमके आणि अन्य मित्रपक्षांसह सरकार स्थापन केलं होतं. तर दुसरीकडे एन. रंगास्वानी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी मित्रपक्षांना केवळ ८ जागांवर विजय मिळाला होता. एनडीएमध्ये एआयएनआरसी १६ जागांवर, भाजप ९ आणि एआयएडीएमके ५ जागांवर निवडणूक लढवली होती. तर युपीएमध्ये काँग्रेसनं १४ आणि डीएमकेनं १३ जागांवर निवडणूक लढवली होती.
Puducherry Assembly Election Results 2021 : पुदुच्चेरीत मतमोजणीला सुरूवात; सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2021 10:00 AM
Puducherry election results 2021 Live updates: Counting begins NDA leads in early counting :- सुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर. ६ एप्रिल रोजी पार पडलं होतं मतदान
ठळक मुद्देसुरूवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर. ६ एप्रिल रोजी पार पडलं होतं मतदान