ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि.२५ - गुडगावमध्ये महानगरपालिकेच्या आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानच्या कलाकारांचा कार्यक्रम चालू असताना शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम उधळून लावला.पाकिस्तानचे कलाकार एका नाटकाचा प्रयोग करत होते. लाहोरमधून चार कलाकार नाटकाच्या प्रयोगासाठी आले होते त्याचवेळी पाच ते सहा कलाकारांनी स्टेजवर जात भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या आणि हा कार्यक्रम बंद पाडला.तर शिवसैनिकांच्या या भूमिकेविषयी पाकिस्तानी कलाकारांनी नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी पोलिसांनी ४ शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहेत. मुंबईत पाकिस्तानी कलाकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांना विरोध दर्शवला होता. तर काही दिवसांपूर्वी गायक गुलाम अलींच्या मुंबईतील कार्यक्रमालाही सेनेनं विरोध केला होता. त्यानंतर आयोजकांनी माघार घेत हा कार्यक्रमच रद्द केला होता.
गुडगावमध्ये शिवसेनेनं उधळला पाक कलाकारांचा कार्यक्रम
By admin | Published: October 25, 2015 10:15 AM