नवी दिल्ली: पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला वर्ष पूर्ण होत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते मोहम्मद सलिम यांनी केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ४० जवानांचं स्मारक उभारण्याची गरज नाही. त्यामुळे केवळ आपल्या असमर्थतेची आठवण होईल. कारण आपण तो हल्ला रोखण्यात अपयशी ठरलो होतो, असं वक्तव्य सलिम यांनी केलं आहे. पुलवाम्यात गेल्या १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. 'आपली असमर्थतता दाखवणारं स्मारक उभारण्याची गरज नाही. आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून ८० किलो आरडीएक्स भारतात कसं आणलं गेलं? जगातल्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत सर्वाधिक जवान तैनात असलेल्या भागात आरडीएक्सचा स्फोट कसा काय झाला?, या प्रश्नांची उत्तरं मिळायला हवीत,' असं सलीम यांनी म्हटलं आहे.पुलवामात वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबाबद्दल, त्यांच्या मित्र परिवाराबद्दल मला पूर्ण सहानुभूती असल्याचं सलिम म्हणाले. पुलवामातला हल्ला रोखण्यात आपण अपयशी ठरलो. त्याबद्दल प्रश्न विचारण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी न्यूज१८ला सांगितलं. भविष्यात अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत, यासाठी प्रश्न विचारायला हवेत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं. 'आम्ही आपल्या जवानांचं रक्षण करू शकलो नाही. वरिष्ठांना त्यांची चिंता नाही. सीमेपलीकडून आरडीएक्स आलं. याची केंद्र सरकारनं चौकशी करायला हवी होती,' असं सलिम यांनी म्हटलं. दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या-पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवालPulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्य
Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 1:14 PM