दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीदजवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!
१)श्रीलंकेने तामिळी वाघांविरुद्ध जशी कारवाई "जाफना" मध्ये केली (जे श्रीलंकेमध्ये श्रीलंकन नागरिक म्हणून राहू इच्छितात त्यांनी "जाफना" सोडून बाहेर यावे त्यांचे व्यवस्थित पुनर्वसन केले जाईल व इतरांवर देशद्रोही म्हणून कारवाई केली जाईल.) अशा तर्हेने श्रीलंकन लष्कराने "जाफना" तामिळी वाघांपासून मुक्त केले व तिथे आता पूर्ण शांतता आहे.
२) POK पण ह्याच पद्धतीने सरकारने मुक्त करून घ्यावा (POK - पाक व्याप्त काश्मीर )
३) संपूर्ण भारतीयांना काश्मीर मध्ये उद्योगधंदा स्थापण्यासाठी जमिनी खरेदी करण्यास परवानगी द्यावी व काश्मीर मध्ये उद्योगधंदे आणून तेथील बेरोजगारी कमी करावी.
नंदकुमार मधुकर मानकामे, पनवेल - नवी मुंबई
9594040901
------------------------------------------------------------------------------
नमस्कार मी सोनू धनराज बडवाईक राह. पिपरा पोस्ट. मिटेवानी ता. तुमसर जिल्हा भंडारा (महा) येथील रहिवासी असून माझा मोबाईल व्हाट्स अँप क्रमांक 9673125826 आहे .
14 फेब्रुवारी ला झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 49 जवान शहीद झाल्याचे ऐकून डोळ्यातून अश्रुधारा निघाल्या. मन भारावून गेलं. आणि मनात एकच विचार आलं की ज्या पद्धतीने जैश-ए-मोहम्मद या बंदी घातलेल्या संघटनेने आदिल अहमद उर्फ वक्कास या युवकास 350 किलो असलेले आरडीएक्स वाहन जवानांच्या गाडीवर नेण्यास प्रवृत्त केले आणि त्याने आपल्या जीवाचा विचार न करता तसे केले, मी विनंती करतो मा पंतप्रधानांना, माझी शप्पत आहे त्या 49 शहीद झालेल्या कुटुंबातील लोकांची जैश-ए-मोहम्मद या संघटनेने फक्त 350 किलो आरडीएक्स असलेले वाहन दिले, आपण मला एक ट्रक भरलेले वाहन द्या, जेवढे आमचे जवान शहीद झाले शप्पत माझ्या आई वडलांची साल्यांचे 200 घेऊन जाईन. मा पंतप्रधान साहेब माझ्या एकट्याचे मरण पावल्याने त्यांचे 200 जवान मारले जात असतील आणि यापासून त्यांना चांगल्या प्रकारे धडा मिळत असेल तर ही गोष्ट माझ्यासाठी आणि या देशासाठी अत्यंत गर्वाची असेल. मी पण प्रयत्न खूप केला की आपणही सीमेवर राहून देशाची सेवा करावी पण नाईलाजाने अपयशच मिळतं गेला. -----------------------------------------------------------------------------
पोपटाने गीतेतील श्लोक म्हटले तो तर भगवान श्रीकृष्ण होतो का ?
कुराण नुसते वाचता आले तर वाचणारा पैगंबर होता का ?
लहान मुलाच्या हातात खेळण्यातील पिस्तुलाऐवजी खरे पिस्तूल आले तर काय होईल ? अनर्थ!
आज नेमके हेच होतंय! पुरेशी मानसिक ,बौद्धिक, शारीरिक क्षमता नसतानाही स्वयंघोषित धर्म गुरू. मौलाना धर्मग्रंथांचे चुकीचे अर्थ लावतात; त्याचीच परिणीती म्हणजे जिहादचे चुकिचे रूपांतरण दहशतवाद ! अल्लाहच्या कार्यासाठी (धर्मकार्यासाठी) जो स्वतःची प्राणाहुती देतो तो जिहादी ! ( त्याला स्वर्गप्राप्ती होते } याच उद्देदेशाने आलमने व अजमल कसाबने जिहाद केला,पण ते जाणार नरकात कारण त्यांनी निरपराध नागरिकांची हत्या केली; याउलट तुकाराम ओंबळे, हेमंत करकरे,अशोक कामठे हे स्वर्गात असणार.
salim agga room no.11 shaikh chawl , shastrinagar,kothrud, pune c.no. 9689607926
--------------------------------------------------------------------------------------
दहशतवाद हा एक मानसिक आजार असेच मला वाटते कारण कोणताही धर्म भेदभाव किंवा द्वेषाला थारा देत नाही लहानपणापासून मुलांना मानसिकदृष्टया विचाराभिमुख बनविले तर ते दहशतवादी लोकांच्या ब्रेन वॉशला बळी पडणार नाहीत शिक्षा देऊन दहशतवाद नष्ट होणार नाही तर मानसिकदृष्टया सक्षम तरुणच दहशतवाद थांबवू शकेल
ऍड निशा गाढे
टी 2 ग्रीन कोर्टर युनिव्हर्सिटी कॅम्पस
औरंगाबाद
---------------------------------------------------------------------------------------
दहशतवाद पुर्ण संपवायचा असल्यास आपल्या सैन्याला पूर्ण स्वातंत्र द्यायला हवे तसेच काश्मीर खोर्यात आजून सैनिक संख्या वाढवली पाहिजे, कारण आपल्या काश्मिर मध्येच हे जिहादी पसरले आहेत. आणी दहशत वाद्यांची घान सगळ्यात आधी आपल्या देशातूनच काढली पाहिजे. सर्जिकल स्ट्राईक 2 नक्कीच केला पाहिजे पण ह्या वेळी पाकिस्तान सुद्धा सर्जिकल स्ट्राईक साठी तयार राहिला असेल त्या मुळे खुप सावध पूणे तयारी केली पाहिजे. तसेच पाकिस्तानला जागतिक पातळी वर एकटे पाडले पाहिजे. त्यांना देण्यात येणारे सिंधु पाणी वाटप पण बंद करण्याची गरज आहे. तसेच J& K मधिल Article 370 सुद्धा काढुन टाकन्याचि गरज आहे. आणि सर्व politician नी राजकरण बाजुला ठेऊन सरकार सोबत ऊभ राहिल पाहिजे.
Aab ki baar, Thok do na yaar.
संकल्प पन्हाळकरगुरूवार पेठ, सातारा.9561351568
---------------------------------------------------------------------------------------------
दहशतवादाला संपवण्यासाठी सुरुवातीला भारतीय लष्कराने त्या दहशतीचा चालना देणार्या लोकांपेक्षाही वरचढ होणे महत्त्वाचे आहे. दहशतवादी संघटनेच्या मुळांचा विनाश करण्यासाठी सगळळ्याच देशांनी एकत्रित येऊन आपल्याकडे असलेल्या ताकदीचे योगदान करुन त्यांच्या विरोधात अक्कल लढवून कट रहायला हवेत. माझ्या मताप्रमाणे बर्याचशा दहशतवादी हल्ल्यात आपल्या सैन्य दलाकडे हव्या तशा आधुनिक अशा प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये भरभक्कम असलेल्या साधनांची व सुरक्षेसा पुरेशा शस्त्रसामग्रीची कमतरता असल्यामुळे जवानांना त्यास हवा तसा प्रतिकार देता आला नाही . तीव्र भावनांतून अस्तित्वात येणारा हा दहशतवाद ज्या दहशतवाद्यांकडून घडवून आणल्या जातो ते लोकं तरुण जे सहजतेने कोणत्याही गोष्टीला आत्मसात करतात किंवा स्वीकारतात त्यांच्यामध्ये या तिव्र भावनेची रुजवणूक करतात. म्हणून अत्यंत महत्त्वाचे म्हणजे तरुणांना व मुलांना या गोष्टींपासून दूर ठेवणे
-------------------------------------------------------------------------------------
दहशदवाद संपविण्यासाठी युद्ध, सर्जिकल स्ट्राईक हेच उपाय आहेत का? हि तात्पुरती मलमपट्टी झाली. जर हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर या प्रश्नाच्या मुळापर्यंत जावं लागेल. आपल्याच देशात राहणाऱ्या काही युवकांना देशाबद्दल प्रेम का वाटत नाही? याचा विचार करायला हवा, तेही आपले बांधवच आहेत की. कुणाच्या मनात एवढा जीवावर उदार होण्याइतपत द्वेष का निर्माण व्हावा? कुणीही विरोध, द्वेष आवडीने करत नाहीत, ती अपरिहार्यता असते. स्थानिक निवडणुकींत 2/4 टक्के मतदान व्हावे इतकी उदासीनता तिथल्या लोकांमध्ये का? त्यांच्या मानसिकतेत बदल कसा घडवता येईल हे बघायला हवे. तिथली शिक्षणपद्धती, तिथला रोजगार यावर लक्ष द्यायला हवे. त्यांच्यात खदखदनाऱ्या असंतोषाची कारणं शोधून त्यावर उपाययोजना करावयास हव्या. त्यांना मुख्य प्रवाहात आणायला हवे, कारण 'स्थानिकांचा असंतोष व त्याचा घेतला जाणार फायदा' हे दहशदवाद फोफावण्याचे मूळ कारण आहे. - महेंद्र सूर्यभान पांगारकर मु. पो. शिंदे ता. जि. नाशिक - 422102 मो. 8411080099
-----------------------------------------------------------------------------------------
भारतात येना-या सर्व सिमालगत रस्त्यांची बंदोबस्त वाढवावा ज्या सीमा बॉंडरीवर तारांचे कुंपन नाही तेथे कुंपन बांधकाम करावेत आणी भारत देशात गुन्हेगारी मधुन होनारे देशद्रोही वर वॉच व कारवाही त्वरीत व्हावी. नाव- श्री सतीश सुधाकर पांडे रा.ता मु. कळमेश्वर जी.नागपुर 441501. Mo.no. 9028789727,9561480227