शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
3
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
4
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Pulwama Attack : दहशदवाद्याचा बिमोड करायचाय तर 'फुटीरतावाद्यांना लगाम घाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 5:17 AM

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला.

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!

फुटीरतावाद्यांना लगाम घालास्थानिक फुटीरतावादी चिथावणीखोरांचे अतिरेक्यांना असलेले समर्थन व आश्रय, हेच काश्मीरमधील दहशतवादी कारवायांचे मूळ आहे. फुटीरतवाद्यांचे अड्डे नष्ट करण्यासाठी लष्कराला स्वातंत्र्य द्यावे. अतिरेक्यांना समर्थन देणाऱ्या नागरिकांवर देशद्रोहाचे खटले दाखल करावेत.- दि. ना. फड,घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड

‘रि-आॅलआउट’ आॅपरेशनची गरजकाश्मीरमध्ये पुन्हा ‘आॅपरेशन रि-आॅलआउट’ सुरू करून लपलेले दहशतवादी आणि त्यांना रसद पुरवणारे देशद्रोही यांना एकाच वेळी यमसदनी पाठवणे हा एकमेव पर्याय भारतापुढे आहे. हे करत असताना भारताने अमेरिकासहित सर्व मोठ्या राष्ट्रांचे सहकार्य घ्यावे, परंतु प्रसंगी आंतरराष्ट्रीय दबाव झुगारावा.- युवराज रघुनाथ पवार,चापानेर, कन्नड, जि. औरंगाबादजागतिक स्तरावर यंत्रणा उभारावीलष्कर ए तोयबा, इसिस, जैश ए मोहम्मद यांसारख्या दहशतवादी संघटनेच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक अत्याधुनिक गोपनीय यंत्रणा जागतिक स्तरावर कार्यान्वित केली पाहिजे. प्रत्येक राज्यात दहशतवादविरोधी ‘अँटी टेरेरिस्ट सेल’स्थापन करावा. लष्कराच्या सूचनांमध्ये प्रचंड गोपनीयता हवी.- राजेंद्र आरगे,हेरवाड, शिरोळ, जि. कोल्हापूर.काश्मीरचा आर्थिक विकास साधाकश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या प्रगतीमध्ये भारतातील सर्व नागरिकांचा समान सहभाग असायला हवा. दहशतवादाचा भयंकर चेहेरा व फुटीरतावाद्यांची संकुचित वृत्ती दिसली आणि आर्थिक विकास झाला तर काश्मिरी युवक दहशतवादाकडे वळणार नाहीत. जे मुठभर लोक चिथावणी देतील, त्यांना हेच युवक उद्या सडेतोड उत्तर नक्कीच देतील.- प्रथमेश व्हनकडे, कुपवाड, जि. सांगली.धडा शिकवाचसध्याच्या परिस्थितीत युद्ध हे कोणालाच परवडणारे नाही. चीन पाकिस्तानची पाठराखण करीत आला आहेच. त्यापेक्षा आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी प्रयत्न करावेत. भारताने सर्व प्रकारचे संबंध तोडून पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र म्हणून जाहीर होण्यासाठी कंबर कसावी. तसे झाल्यास पाकिस्ताना राष्ट्र म्हणून आपोआपच कोसळून पडेल.- ओंकार गोवारकर,देव नगर, नागपूरएक घाव, दोन तुकडेभारताने पाकिस्तानला कायम स्वरुपी अद्दल शिकवावी. ४४ जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. स्व. इंदिरा गांधी यांनी १९७१ रोजी एक घाव घालून पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. तशीच कारवाई भारताने आता करायला हवी. जैश ए मोहम्मद हल्ल्याची जबाबदारी घेउ शकते तर भारत सरकार जैश ए मोहम्मदला संपावण्याची जबाबदारी का नाही घेऊ शकत?- ऋषिकेश साळुंके, मु.पो.घारगाव ता. कळंब जि. उस्मानाबादजबरी हल्ला कराभारतीय सैनिकांच्या शौर्यगाथा वाचत आणि ऐकत आलेलो आपण, आता आपल्या सैनिकांच्या केविलवाण्या बातम्या ऐकाव्या लागत आहेत. याला जवाबदार केवळ आणि केवळ राजकीय लोक आहेत. इस्रायलकडून प्रेरणा घेऊन पाकिस्तानवर जबरदस्त हल्ला करायला पाहिजे.- दयानाथ कुर्मी, कोथरुड, पुणेआक्रमक पाऊल उचलण्याची गरजदहशतवाद ही समस्या केवळ एका राष्ट्रापुरतीच मर्यादित राहिली नसून जगातील बहुतांश देशांना दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येणे आवश्यक आहे.भारत जागतिक स्तरावरुन तसे प्रयत्न करत आहे. पाकिस्तानची आर्थिक व राजनैतिक कोंडी करण्यात भारताला यश आले आहे. तरी देखील भारताला आता पाकिस्तान विरोधात आक्रमक पाऊल उचलण्याची गरज आहे. मोदींनी पाकिस्तान विरोधात सर्जिकल स्ट्राईक केले. मात्र पुढे हा प्रयोग तिथेच थांबला. त्याचा गाजावाजा करण्यातच सरकार व्यस्त होते. पाकिस्तान एका सर्जिकल ने सरळ होणारा देश नाही.- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल, वर्धा 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी