शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 4:16 PM

पुलवामातील हल्ल्यात आमचा हात नाही; पाकिस्तानी लष्करानं हात झटकले

नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन आमच्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करत पाकिस्तानी लष्करानं हात झटकले आहेत. भारतानंच दहशतवाद पोसला. पाकिस्तानवर युद्ध लादलं. भारतात निवडणुका असतात, त्याचवेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, त्यावेळी भारताकडून दबाव आणला जातो, अशा उलट्या बोंबादेखील पाकिस्तानी लष्करानं मारल्या. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारतानं आमच्यावर बेछूट आरोप केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप केले गेले. त्या आरोपांची चौकशी आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच आम्हाला उत्तर देण्यास उशीर झाला, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी लष्करानं दिलं. पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा जावईशोध पाकिस्ताननं लावला. 'पुलवामातील ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?', असा प्रश्न पाकिस्तानी लष्करानं उपस्थित केला. पुलवामातील हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्करानं अप्रत्यक्षपणे भारतीय सैन्यालाच जबाबदार धरलं. 'काश्मीरमध्ये जवानांचा कडक पहारा असतो. त्या भागात सर्वसामान्य जनतेपेक्षा लष्कराच्या जवानांची संख्या जास्त आहे. सत्तर वर्षांपासून भारतीय सैन्य तिथे आहे. तिथे जर पाकिस्तानी व्यक्ती पोहोचली असा भारताचा दावा असेल, तर मग सुरक्षेत काहीतरी चूक झाली असेल,' असं म्हणत गफूर यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला. 'पुलवामा हल्ला ज्यानं घडवला, तो तरुण काश्मीरचाच रहिवासी आहे. त्याला भारतीय सैन्यानं वाईट वागणूक दिली होती, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत. सैन्यानं दिलेल्या वर्तणुकीचा राग मनात धरुन त्यानं हा हल्ला केला असावा,' असा दावा पाकिस्तानी लष्करानं केला. भारताकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपदेखील पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. 'भारतात ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, नेमका त्याचवेळी भारताकडून दबाव आणला जातो. ज्यावेळी संवाद सुरू असतो, संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू असते, त्याचवेळी भारतात दहशतवादी कारवाया होतात,' असं अजब तर्कट पाकिस्तानी लष्करानं मांडलं. '2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. त्याच्या पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत्या. 2008 मध्ये मुंबईवर हल्ला झाला. 2009 मध्ये भारतात निवडणूक होती. आता भारतात लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. नेमक्या त्याचवेळी पुलवामात हल्ला झाला,' असं म्हणत पाकिस्तानी लष्करानं भारतालाच दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार धरलं.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानIndian Armyभारतीय जवानElectionनिवडणूकJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला