Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 06:30 PM2019-02-17T18:30:45+5:302019-02-17T18:33:18+5:30

वादग्रस्त विधानामुळे नवज्योत सिंग सिद्धू अडचणीत

pulwama attack paresh rawal attacks congress leader sonia gndhi over controversial statement of navjot singh sidhu | Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

Pulwama Attack: 'सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजूतदार'

मुंबई: काश्मीरच्या पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याबद्दल केलेल्या विधानावरुन काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू अडचणीत आले आहेत. सिद्धू यांच्याविरोधात अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यानंतर सोनी टीव्हीनं 'द कपिल शर्मा शो'मधून सिद्धू यांची हकालपट्टी केली. यावरुन आता भाजपा खासदार परेश रावल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 

सोनी टीव्ही सोनिया गांधींपेक्षा जास्त समजतूदार असल्याचा टोला परेश रावल यांनी लगावला. पुलवामातील हल्ल्यावरुन केलेल्या विधानामुळे नवज्योत सिंह सिद्धू सोशल मीडियाच्या रडारवर आहेत. काल बॉयकॉट सिद्धू हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंडमध्ये होता. द कपिल शर्मा शोमधून सिद्धू यांनी काढून टाका, अशी मागणी जोर धरु लागली होती. हा दबाव वाढल्यानंतर त्यांना शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. दहशतवादाला कोणताही धर्म किंवा देश नसतो. दहशतवाद्यांची कोणतीही जात नसते, असं पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या सिद्धू यांनी म्हटलं होतं. संवादाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवा, असंदेखील ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर चौफेर टीका झाली होती.

गुरुवारी काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरामध्ये दहशतवादी हल्ला झाला. तब्बल अडीच हजार सीआरपीएफ जवानांचा ताफा जात असताना त्यातील एका बसला कारनं धडक दिली. या कारमध्ये तब्बल 200 किलो स्फोटकं होती. आदिल अहमद दार या दहशतवाद्यानं हा आत्मघाती हल्ला घडवला. त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. तर अनेकजण जखमी झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. 
 

Web Title: pulwama attack paresh rawal attacks congress leader sonia gndhi over controversial statement of navjot singh sidhu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.