नवी दिल्ली : काँग्रेस नेते उदित राज (Congress Leader Udit Raj) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत (PM Narendra Modi Security Breach) वादग्रस्त ट्विट केले आहे. सत्तेच्या भूकेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Modi) पुलवामा घटना घडवून आणल्याचे ट्विट उदित राज यांनी केले आहे. यावर भाजपाने उदित राज यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
उदित राज यांचे वाग्रस्त ट्विटकाँग्रेस नेते उदित राज यांनी ट्विट केले आहे की, पीएम मोदींच्या सुरक्षेच्या नावाखाली ढोंगी आणि पुजाऱ्यांचे दुकान सुरू झाले आहे. तर उदित राज यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नौटंकीमुळे आता पुष्टी झाली आहे की, सत्तेच्या भुकेसाठी पुलवामा घटना स्वतःच घडवून आणली गेली आहे.'
'जे काही घडले ते नौटंकी'दरम्यान, आपल्या वादग्रस्त ट्विटवर उदित राज यांनी झी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, फिरोजपूरमध्ये जे काही घडले त्याला नौटंकी म्हटले जाईल, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कोणीही गोळीबार किंवा दगडफेक केली नाही, मग मी वाचलो असे ते का म्हणाले? विनाकारण या प्रकरणाचा भडिमार केला जात आहे.
भाजपाकडून पलटवारकाँग्रेस नेते उदित राज यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या सांगण्यावरून अशी विधाने करत आहेत. मी असेही म्हणू शकतो की, राहुल गांधी चीनमधून पैसे घेतात. सोनिया गांधींना पाकिस्तानातून लोकशाही कमकुवत करण्याच्या सूचना मिळतात. पण पुराव्याशिवाय आम्ही कोणावरही निराधार आरोप करत नाही. उदित राज भाजपामध्ये असताना काँग्रेसवर आरोप करायचे, आता काँग्रेसमध्ये गेले आहेत, त्यामुळे भाजपावर आरोप करत आहेत.