56 इंचाची छाती कधी उत्तर देणार ?, काँग्रेसची मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:23 PM2019-02-14T22:23:05+5:302019-02-14T22:26:26+5:30

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये आज मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.

pulwama attack randeep surjewala ask when will the 56 inch chest reply | 56 इंचाची छाती कधी उत्तर देणार ?, काँग्रेसची मोदींवर टीका

56 इंचाची छाती कधी उत्तर देणार ?, काँग्रेसची मोदींवर टीका

Next

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामामध्ये आज मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांच्या बसवर निशाणा साधला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले असून, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदींवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदींवर टीका केली आहे. सुरजेवाला म्हणाले, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदवतो, तसेच शहिदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. गेल्या पाच वर्षांच्या मोदी सरकारच्या काळातील हा 18ला मोठा हल्ला आहे. 56 इंचाची छाती या दहशतवादी हल्ल्याला कधी चोख उत्तर देणार ?, देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जातेय, असंही सुरजेवाला म्हणाले.



काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. पुलवाम्यातील अवंतीपुराजवळच्या गोरीपोरा भागात सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी एकत्रित हल्ला चढवला. जवानांची बस ज्या रस्त्यावरून जाणार होती, त्या ठिकाणी एका कारमध्ये दहशतवाद्यांनी आयईडी बॉम्ब ठेवला होता. जवानांची बस त्या उभा असलेल्या गाडीजवळ येतात त्या कारचा स्फोट झाला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. जवानांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. अतिरेक्यांनी 200 किलो स्फोटांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. या ताफ्यात सीआरपीएफच्या तीन बटालियन होत्या. या तीन बटालियनमध्ये जवळपास 2500 हजार सैन्य होते. 

Web Title: pulwama attack randeep surjewala ask when will the 56 inch chest reply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.