शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

Pulwama Attack: स्फोट घडवण्यात तरबेज अब्दुल रशीद गाझी याच्यामुळेच झाला दहशतवादी हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 6:05 AM

सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे.

श्रीनगर : सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे. तो मूळचा अफगाणिस्तानातील असून, मसूद अझहर यानेच अमेरिकी सैन्याविरोधी कारवायांसाठी अब्दुल रशीदला तेथे पाठवले होते.

काही महिन्यांपूर्वी मसूद अझहरचा पुतण्या व भाचा यांचा सुरक्षा दलांनी काश्मीरमधील चकमकीत खात्मा केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मसूद अझहर याने अब्दुल रशीदला काश्मीरमध्ये पाठवले. तो आयईडीद्वारे स्फोट घडवण्यातील तरबेज आहे. अब्दुल रशीद ९ डिसेंबर रोजी काश्मीरमध्ये घुसला आणि तेव्हापासून तो अद्याप काश्मीरमध्ये असल्याची गुप्तचरांची माहिती आहे.

अब्दुल रशीद गाझी हा ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण तळाचा काहीकाळ प्रमुख होता. काश्मीर खोऱ्यातील तरुणांना तिथे प्रशिक्षण दिले जात असे. त्यानेच आदिल दार याला सहा महिन्यांपूर्वी स्फोटके हाताळण्याचे आणि स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिल्याचे सांगण्यात येते. काश्मीरमध्ये आल्यावर पुन्हा त्याने आदिल दारशी संपर्क साधला आणि त्याच्यामार्फत गुरुवारच्या हल्ल्याची योजना पूर्णत्वास नेली.- सीआरपीएफच्या जवानांमध्ये गोंधळ उडवून देणे, हाच त्यामागील हेतू होता. किमान ५ ते ६ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, असे उघड झाले आहे. स्फोटामुळे एक बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर काही बसेसचे बरेच नुकसान झाले. शिवाय काही बसेसवर गोळीबाराच्या खुणाही दिसून आल्या. मात्र स्फोटानंतरच्या गोंधळात दहशतवादी पळून गेले. त्यांचाही शोध सुरू आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर