नवी दिल्ली : पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दलची महत्त्वाची माहिती जैश-ए-महंमदचा वरिष्ठ कमांडर निसार अहमद तांत्रे याने चौकशीत दिली. जैश-ए-महंमदवर बंदी घालण्यात आलेली आहे.
गेल्याच आठवड्यात त्याला संयुक्त अरब अमिरातने (यूएई) भारताच्या हवाली केले. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तांत्रे याने मला पुलवामातील हल्ल्याची माहिती आधीच होती, असे अधिकाऱ्यांना सांगितले. सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यात जैश-ए-महंमदच्या वरिष्ठ नेतृत्वाची भूमिका होती, हे तांत्रे याच्या कबुलीतून प्रथमच उघड होत आहे. निसार तांत्रे याने चौकशी अधिकाऱ्यांना हल्ल्यामागे मुदास्सीर खान याचे डोके होते, असे सांगितले.यूएईतून आणले भारतातएनआयएने तांत्रे याला गेल्या आठवड्यात अटक केली. २०१७ मध्ये लेथपोरा येथील सीआरपीएफच्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यापासून तांत्रे फरार होता. दोन महिन्यांपूर्वी तो यूएईला पळून गेला. जैशचा कमांडर नूर तांत्रे याचा निसार धाकटा भाऊ, भारत सरकारने त्याला ३१ मार्चला देशात आणले.