नवी दिल्ली- दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेच्या 40 जवानांना वीरमरण आले आहे. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्यानंतर पूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. दहशतवादी संघटना असलेल्या जैश-ए-मोहम्मदनं पूर्वनियोजित कट आखून जवानांना लक्ष्य केलं आहे. परंतु अद्यापही अनेक शहीद जवानांच्या कुटुंबीयांना अधिकृतरीत्या देशासाठी वीरमरण झालेल्यांची माहिती मिळालेली नाही.शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 38 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे.
- ही आहेत शहीद जवानांची नावं
1. राठोड नितीन शिवाजी
2. भागिरथी सिंग
3. वीरेंद्र सिंग
4. अवधेश कुमार यादव
5. रतन कुमार ठाकूर
6. पंकज कुमार त्रिपाठी
7. जीत राम
8. अमित कुमार
9. विजय कुमार मौर्य
10. कुलविंदर सिंग
11. मनेश्वर बासुमतारी
12. मोहन लाल
13. संजय कुमार सिन्हा
14. राम वकील
15. नसीर अहमद
16. जैमल सिंग
17. सुखविंदर सिंग
18. टिलक राज
19. रोहिताश लांबा
20. विजय सोरेंग
21. वसंता कुमार व्ही. व्ही
22. सुब्रमण्यम जी.
23. गुरू एच.
24. मनोज बेहरा
25. नारायल लाल गुरजार
26. महेश कुमार
27. प्रदीप कुमार
28. हेमराज मीना
29. पी. के. साहू
30. रमेश यादव
31. संजय राजपूत
32. कौशल कुमार रावत
33. प्रदीप सिंग
34. श्याम बाबू
35. अजित कुमार आझाद
36. मनिंदर सिंग अत्री
37. बब्लू संतरा
38. अश्वनी कुमार कोची
39. शीवचंद्रन
40. सुदीप बिश्वास