नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्याच्या सात दिवसांनंतर काँग्रेसनं पत्रकार परिषद घेत मोदींवर हल्लाबोल केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा दहशतवादी हल्ल्यात देशातील 40 जवान शहीद झाले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी कॉर्बेट पार्कमध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. जगात असा कुठला पंतप्रधान असेल का?, असा प्रश्नही काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला आहे.पुलवामा हल्ला 3 वाजून 10 मिनिटांनी झाला आणि मोदी संध्याकाळी 6.10 वाजता शूटिंगमध्ये बिझी होते. तर दुसरीकडे देश छिन्नविछिन्न शहिदांच्या मृतदेहांकडे पाहत होता. दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चुली बंद होत्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधल्या रामनगरच्या गेस्ट हाऊसमध्ये चहा-नाश्ता करत होते. जगातल्या कोणत्याही देशाला क्वचितच असा पंतप्रधान लाभला असावा. भारताचे पंतप्रधान पुलवामा हल्ल्याच्या चार तासांनंतरही वनविहार करण्यात व्यस्त होते. जवानांवर हल्ला झाला, त्यानंतरही त्यांचं तीन तास शूटिंग सुरू होते. पुलवामा हल्ल्यानंतरही मोदींच्या सभा थांबल्या नाहीत.
'जवानांवर हल्ला झाल्यानंतरही मोदी शूटिंगमध्ये बिझी होते'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 1:01 PM