शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

मुलासाठी खेळणी पाठवतो म्हणाला, पण...; आठ महिन्यांपूर्वीच बाबा झालेल्या जवानाला वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 1:48 PM

Pulwama Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत.

ठळक मुद्देपुलवामा दहशतवादी हल्ल्यात पंजाबमधील जवान सुखजिंदर सिंग शहीददहशतवादी हल्ल्याविरोधात व्यक्त केला जातोय तीव्र निषेध

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले. पंजाबमधील तरणतारण येथील गंडीविंड धत्तल गावातील जवान सुखजिंदर सिंग हेदेखील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले आहेत. सुखजिंदर सिंग सीआरपीएफच्या 76व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. महिन्याभराच्या सुट्टीनंतर सुखजिंदर सिंग 28 जानेवारी रोजी पुन्हा आपल्या कर्तव्यावर रूजू झाले होते. कर्तव्य बजावण्यास जाण्यापूर्वी ते वारंवार आपल्या आठ वर्षांचा मुलगा गुरजोत सिंगचा मुका घेत होते. 

दरम्यान, दहशतवादी हल्ल्याच्या दिवशीच सुखजिंदर सिंग यांनी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास भाऊ गुरजंट सिंग जंटा यांच्यासोबत फोनवरुन संपर्क साधला होता. यावेळेस त्यांनी भावाला सांगितले की,  जम्मू काश्मीरमधील रस्ते काही दिवस बंद  असल्याच्या कारणामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र आता दुरुस्तीनंतर येथील रस्ते खुले करण्यात आले आहेत. खुल्या करण्यात आलेल्या मार्गावरुन सीआरपीएफच्या 2,547 जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरच्या दिशेनं प्रवास करणार आहे. 

गुरजंट सिंग जंटा यांनी सांगितले की, सुखजिंदर सिंग फोनवर वारंवार मुलगा गुरजोत सिंगबाबत विचारपूस करत होते. आपला मुलगा रडत नाहीय ना?, तो ठीक आहे ना?, असे प्रश्न त्यांनी भावाला विचारले. शिवाय, काही दिवसांमध्ये मुलासाठी भरपूर खेळणी पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण काही वेळाने होत्याचे नव्हते झाले. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे वृत्त कुटुंबीयांना समजले आणि आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. हल्ल्यात सुखजिंदर सिंगदेखील शहीद झाल्याचे वृत्त मिळाले. या वृत्तामुळे संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. 

भारतीय लष्करावर सर्वांत मोठा हल्लादरम्यान, पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. गुरुवारी (14 फेब्रुवारी)जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. ज्या ताफ्यावर हा हल्ला झाला, त्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवली. आदिलने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेनं नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवला. हा हल्ला इतका भीषण होता की, स्फोटात जवानांच्या बसच्या चिंधड्या उडाल्या. 

तालिबानी स्टाईलचा हल्लावाहनांमध्ये स्फोटके भरून ती एखाद्या गर्दीच्या ठिकाणी घुसवायची आणि आत्मघाती हल्ला घडवून आणायचा ही तालिबानी अतिरेक्यांची स्टाइल आहे. असा हल्ला आतापर्यंत भारतात, काश्मीरमध्ये कधीही झाला नव्हता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने या हल्ल्यासाठी आयईडी स्फोटांचे ट्रेनिंग दिले होते. तो तालिबानी संघटनेत कार्यरत होता. त्यानेच हा हल्ला तालिबानी स्टाइलने घडविल्याचे म्हणणे आहे. तालिबानी संघटना पाकमध्ये सैनिकांवर अशाच प्रकारे हल्ला करतात. तीच पद्धत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने गुरुवारच्या हल्ल्यात वापरली. 192 काश्मिरी तरूण गेल्या वर्षभरात दहशतवादी संघटनांमध्ये गेले आहेत.स्थानिक तरूणांनी दहशतवादाकडे वळणे ही लष्कराच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. चकमकीत स्थानिक दहशतवाद्यांना मारल्याची काश्मीर खोऱ्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.

काय होता गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट?या हल्ल्याच्या पूर्वी भारताच्या गुप्तचर संस्थांनी अ‍ॅलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले होते की, संसदेवरील ह्ल्ल्याप्रकरणी ज्या दिवशी (९ फेब्रुवारी) अफजल गुरूला फासावर लटकवण्यात आले त्याच दिवशी हल्ला करायचा कट, अतिरेक्यांनी रचला आहे. हल्ल्यावेळी आयईडी स्फोट घडविले जाऊ शकतात. सर्व सुरक्षा संस्थांनी अ‍ॅलर्ट राहावे.

 

 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीMartyrशहीद