शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

Pulwama Attack: राजनाथ सिंहांनी वाहिली श्रद्धांजली; शहीद जवानाच्या पार्थिवाला दिला खांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 4:24 PM

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंह काश्मीरमध्ये

श्रीनगर: पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बडगाममध्ये श्रद्धांजली वाहिली. काल अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 38 जवानांना वीरमरण आलं. या सर्व जवानांना आज बडगाममध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर आता या जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहेत. यावेळी राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना खांदा दिला. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुलवामामधील अवंतीपुरात झालेल्या हल्ल्यामागे असणाऱ्यांना सोडणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं. या हल्ल्याचा आणि जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेतला जाईल, अशा शब्दांमध्ये त्यांनी पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. यानंतर आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी जवानांना कारवाई करण्यास पूर्णपणे मोकळीक दिली असल्याचं म्हटलं. पाकिस्ताननं अधोगतीचा मार्ग निवडला आहे. दहशतवादी हल्ला करुन त्यांनी घोडचूक केली आहे. यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडणार नाही, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी झाशीतील एका जनसभेला संबोधित करताना पाकिस्तानला स्पष्ट शब्दांमध्ये इशारा दिला. 'पुढील कारवाईची काळ, वेळ आणि त्या कारवाईचं स्वरुप ठरवण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य सुरक्षा दलांना देण्यात आलं आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती तोळामासा झाली आहे. मात्र तरीही त्यांच्याकडून दहशतवादी हल्ले केले जात आहेत. त्यांच्या या कारवायांना देशातील 130 कोटी जनता चोख प्रत्युत्तर देईल,' अशा शब्दांमध्ये पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावलं. काल काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात सीआरपीएफचे 38 जवान शहीद झाले. तर अनेक जवान गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.  

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRajnath Singhराजनाथ सिंहTerror Attackदहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर