Oxygen Shortage: देवदूत! पंक्चर काढणाऱ्याने ६० वर्षीय नागरिकाने दिले ९० ऑक्सिजन सिलेंडर; रुग्णांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:54 PM2021-05-05T16:54:58+5:302021-05-05T16:56:12+5:30
Oxygen Shortage: गंभीर परिस्थितीत पंक्चर काढणाऱ्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
श्योपूर: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे गंभीर परिणाम दिसत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढत चालले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स, कोरोना लसींचा मोठा तुडवटा जाणवू लागला आहे. मात्र, गंभीर परिस्थितीत पंक्चर काढणाऱ्या ६० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्याने ९० ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे दिलासा मिळाल्याचे म्हटले जात आहे. (a puncture wala in sheopur gave 90 oxygen cylinder to patients)
मध्य प्रदेशमधील श्योपूर भागातील एका पंक्चर काढणाऱ्या व्यक्तीने गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन ९० ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून दिले. एका वृत्तपत्राशी बोलताना पंक्चर काढणाऱ्या रियाज मोहम्मद यांनी सांगितले की, पंक्चर काढण्यासोबत ऑक्सिजन पुरवठा करण्याचा छोटासा व्यवसायही करतो. या भागात ऑक्सिजनची कमतरता असल्याची माहिती मिळाली. यानंतर तातडीने ९० ऑक्सिजन सिलेंडर जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून दिले, असे रियाज यांनी सांगितले.
“भविष्यात OBC मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा...”
रियाज यांची मोठी मदद झाली
श्योपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, रियाज यांची मोठी मदत झाली. त्यांनी वेळीच ९० ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यांनी दिलेले ऑक्सिजन सिलेंडर ग्वाल्हेर आणि भिंड येथे पाठवले आहेत. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या अन्य व्यापाऱ्यांकडूनही मदत केली जात आहे. याचा उपयोग जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रभावीपणे केला जात आहे, असे ते म्हणाले. प्राणाशी संघर्ष करत असलेल्यांना मदत करण्यात सक्षम असल्यामुळे मदत करू शकलो. केवळ माझे योगदान दिले आहे, असेही रियाज यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाबाबत आता पंतप्रधान व राष्ट्रपतींनी तातडीचा निर्णय घ्यावा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कडक लॉकडाऊन अनिवार्य
वीकेंड लॉकडाऊन, नाइट कर्फ्यूचा काही उपयोग नाही. कडक लॉकडाऊन अनिवार्य आहे. देशात आताच्या घडीला रुग्णालयांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे. आक्रमक कार्यपद्धती स्वीकारून रुग्णसंख्या कमी करणे आणि मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन करणे या तीन गोष्टींवर सर्वाधिक भर देण्याची आवश्यकता आहे. आपण माणसामाणसांतील संपर्क टाळू शकलो, तर रुग्णसंख्या कमी होऊ शकते, असे डॉ. गुलेरिया यांनी नमूद केले.
“मराठा समाज बांधव विचारतायत, आमचा प्रामाणिक ‘नायक’ कोण?”
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयासह देशातील अनेक उच्च न्यायालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरता, कोरोनाचा उद्रेक यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, छत्तीसगढ, पंजाब, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दमण आणि दिव, लक्षद्वीप आणि लडाख या ठिकाणी गेल्या १५ दिवसांमध्ये रुग्णसंख्या घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही केरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून, या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.