शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

रॅश ड्रायव्हिंगमध्ये पुणेकर देशात चौथ्या स्थानी; कोची शहर ठरले अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2020 5:53 PM

पुणे शहरात वाहन चालवून दाखविले तर तो देशात कोठेही वाहन चालवू शकतो..

ठळक मुद्देनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१९ ची देशभरातील गुन्हेविषयक माहितीचा अहवाल केला प्रसिद्ध

पुणे : पुणे शहरात वाहन चालवून दाखविले तर तो देशात कोठेही वाहन चालवू शकतो, असे विनोदाने का होईना म्हटले जात असले तरी ते काही प्रमाणात खरे आहे.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार रॅश ड्रायव्हिंग करण्यात पुणेकर हे देशात चौथ्या क्रमांकावर आहे.कोची, सुरत, चेन्नई पाठोपाठ पुण्याचा देशात चौथा क्रमांक लागतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०१९ ची देशभरातील गुन्हेविषयक माहितीचा क्राईम इन इंडिया २०१९ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. कोची (१०५०८), सुरत (६२८२), चेन्नई (५६४२) यानंतर पुणे (४४४२) येथे पोलिसांनी रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांवर २०१९ मध्ये कारवाई करण्यात आली होती. पुण्यानंतर दिल्ली (४२९७), बंगलुरु (४०१९), इंदौर (३०६८), मुंबई २९९६) यांचा क्रमांक लागतो. प्राणघातक अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने पुणे वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षी हेल्मेट सक्तीची मोहीम राबविली होती़ त्याचबरोबर मोठ्या रस्त्यांवर रॉन्ग ग साईडने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच फुटपाथवरुन वाहन चालविणाऱ्यांविरुद्धही रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात येत होता. विशेषत: ज्याठिकाणी एकेरी वाहतूक आहे, अशा रोडच्या शेवटच्या टोकाला थांबून विरुद्ध दिशेने येणाऱ्यांवर गेल्या वर्षी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती. त्यामुळे पुणे शहरातील रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांची संख्या अधिक दिसत आहे. 

हिंसात्मक घटनांमध्ये घटसर्व प्रकारच्या हिंसात्मक घटनांमध्ये गेल्या दोन वर्षात घट झाल्याचे दिसून आले असली तरी गेल्या दोन वर्षात पाटणापेक्षा पुण्यात हिंसात्मक घटना अधिक घडत असल्याचे दिसून येत आहे. दिल्ली ११ हजार ३१३ सर्व प्रकारच्या हिंसात्मक घटना २०१९ मध्ये घडल्या होत्या. त्या खालोखाल मुंबई (५९९५), बंगलुरु (३३३०), जयपूर (१८९२), पुणे (१६६१), पाटणा (१५९७) घटना घडल्या होत्या. त्याचवेळी २०१७ मध्ये पुण्यात हिंसात्मक घटना (२४७०) घडल्या असताना पाटणात (४२८२) घटना घडल्या होत्या. दोन वर्षात पाटण्यातील हिंसात्मक घटनांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस