शहरं
Join us  
Trending Stories
1
“राहुल गांधी संविधान घेऊन सगळीकडे जातात, पण कोर्टाचे आदेश पाळत नाहीत”; कुणी केली टीका?
2
इंडिया आघाडीत मतभेद; अदानी-EVM सारख्या काँग्रेसच्या अजेंड्यावर विरोधकांमध्ये एकमत नाही
3
मनोरुग्ण भावाला शोधता-शोधता 'तोच' वेडापिसा होण्याच्या मार्गावर; महिनाभरापासून जिवाचे रान
4
अरिहंत ऑइल्स कंपनीला घातला सहा काेटींना गंडा; बनावट पावत्यांच्या माध्यमातून फसवणूक, लातुरातील घटना
5
भिवंडीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर 'आयटक'च्या शेकडो कामगारांचे धरणे आंदोलन
6
जळगावमध्ये पारोळानजीक भीषण अपघात; सुरत येथील मध्यमवयीन दाम्पत्य ठार
7
EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचा एल्गार, उद्यापासून स्वाक्षरी मोहीम, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
8
“गरज सरो, वैद्य मरो हा भाजपाचा धर्म”; बच्चू कडू यांची टीका
9
यूपी गेट, चिल्ला बॉर्डरवर प्रचंड वाहतूक कोंडी… चर्चा निष्फळ झाल्यास शेतकरी दिल्लीकडे कूच करणार! 
10
“उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा
11
बापरे! लग्नमंडपात शिरला कुत्रा, घातला धुमाकूळ, नवरा-नवरीची पळापळ, अन् मग... (Video)
12
सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
13
बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराबाबत ममता बॅनर्जींनी मोदी सरकारला केली खास विनंती
14
"तुमची कोंडी करण्याचा प्रयत्न होईल, शिंदेंना मी आधीच सांगितलं होतं’’, या नेत्यानं केला दावा  
15
स्टीलनंतर आता ईव्ही मार्केटमध्ये JSW Group उतरणार, Tata-Mahindra ला देणार टक्कर!
16
INDU19 vs JPNU19 : भारतीय संघानं २११ धावांनी जिंकला सामना; जाणून घ्या सेमीचं समीकरण
17
जुळून येती रेशीमगाठी! मालिकेच्या सेटवर जमल्या जोड्या, बांधली लग्नगाठ, पाहा कोण आहेत ते?
18
“निवडणूक संपताच ST भाडेवाढ, लाडक्या बहिणीला २१०० देतील असे वाटत नाही”: नाना पटोले
19
"देवीने स्वप्नात येऊन सांगितलं, बळी द्या म्हणजे मुलगा बरा होईल", त्यानंतर घडलं भयानक...  
20
“शेवटी भाजपा सांगेल तेच आता करावे लागणार”; मनसे नेत्याची एकनाथ शिंदेवर टीका

सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 6:28 PM

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे.

Punjab Sukhbir Singh Badal : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने(शीख धर्मातील सर्वोच्च समिती) धार्मिक शिक्षा सुनावली आहे. 2015 मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने सोमवारी(दि.2) बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच सुखबीर सिंह बादल यांना अकाल तख्तने 'तनखैय्या' (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते. त्यानंतर आता आज अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली, ज्यामध्ये बादल यांच्यासह अकाली सरकारच्या काळातील मंत्रिमंडळ सदस्यांनाही धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, अकाल तख्तचे जथेदार ग्यानी रघुबीर सिंह यांनी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा तीन दिवसांत स्वीकारुन अकाल तख्त साहिबला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सदस्यत्व मोहीम सुरू करून सहा महिन्यांत नवीन अध्यक्ष निवडण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकाशसिंग बादल यांची 'फकर-ए-कौम' पदवी काढून घेतलेअकाली सरकारच्या काळात वादग्रस्त धर्मगुरू डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला देण्यात आलेली माफी लक्षात घेऊन अकाल तख्तने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना दिलेली 'फकर-ए-कौम' पदवी परत घेतली आहे. 2007 मध्ये सलाबतपुरा येथे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याने गुरू गोविंद सिंग यांच्यासारखे कपडे घालून अमृत शिंपडण्याचे नाटक केले होते. याप्रकरणी राम रहीनविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण राम रहीमला शिक्षा होण्याऐवजी अकाली सरकारने त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले.

सुखबीर सिंग बादल यांच्यावरील आरोप

सरकारमधील जातीय मुद्द्यांवरुन लक्ष वळवणेशीख तरुणांवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती देणेराम रहीमवर दाखल झालेला गुन्हा मागे घेणेजथेदारांना चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून राम रहीमला माफ करण्यास सांगणेपवित्र प्रतिमांची चोरी आणि विटंबनाच्या प्रकरणांचा तपास न करणेसंगतांवर लाठीचार्ज आणि गोळीबार करणेतरुणांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी कोणतीही समिती स्थापन न करणे

टॅग्स :Shiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलPunjabपंजाबamritsar-pcअमृतसरsikhशीख