नवी दिल्ली - देशभरात कोरोना महामारीचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची (Election 2022) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. या पाच राज्यांपैकी अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पंजाब आणि गोवा या दोन राज्यांमध्ये निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी, पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आपची जादू पहायला मिळाली आहे. त्यामुळे, येथे आम आदमी पक्षाचे प्रभुत्वही दिसून येते. आता, पंजाबमधील निवडणुकांसाठी आपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील विधानसभा निवडणुकांसाठी भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत होत असून भाजपचेही आव्हान या दोन्ही पक्षांनी असणार आहे. तसेच, तेथील प्रादेशिक पक्षांनाही आम आदमीला तोंड द्यावे लागणार आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन, व यावेळी राजकीय पक्षांनी घेतलेल्या भूमिका या निवडणुकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.