- बलवंत तक्षक चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी लोक काँग्रेस पक्ष स्थापन केला व भाजपशी युतीही केली तरी राजकारणात त्यांचा आलेख वर जाताना दिसत नाही. याच कारणामुळे त्यांच्या पक्षाचे उमेदवार पक्षाचे निवडणूक चिन्ह हॉकी स्टिकवर लढू इच्छित नाहीत. सहा उमेदवारांनी सिंग यांना म्हटले की, आम्हाला ‘हॉकी स्टिक-बॉल’ ऐवजी ‘कमळ’ चिन्ह हवे आहे. युतीमध्ये जागा वाटपात अमरिंदर सिंग यांच्या वाट्याला आलेल्या या सहा जागा शहरी मतदारसंघांतील आहेत. तेथे भाजपला जास्त आधार आहे. उमेदवारांच्या या इच्छेनंतर सिंग यांनी याबाबत भाजपच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे.
Punjab Assembly Election 2022: कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या सहा उमेदवारांना हवे चिन्ह कमळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 6:47 AM