करिअर पणाला पंजाबमध्ये विक्रम सिंह मजिठिया यांचे नाव बहुतांश वेळा अमली पदार्थांच्या धंद्याशी जोडले गेलेले आहे. ते अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांचे मेहुणे आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी मजिठिया यांना आपल्याविरोधात अमृतसरमधून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले हाेते. मजिठिया यांनी फक्त आव्हान स्वीकारले असे नाही, तर त्यांचा परंपरागत मतदारसंघ मजिठातून उमेदवारी अर्ज भरला नाही. आता करिअर कोणाचे संपणार मजिठिया की सिद्धू यांचे?
मांजरांच्या भांडणातलखनौतील सरोजिनीनगर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत महिला शक्तीचे प्रतीक बनून स्वाती सिंह विजयी झाल्या होत्या. त्यांना योगी मंत्रिमंडळात महिला आणि बालविकास मंत्रिपद दिले गेले होते; परंतु या निवडणुकीत या जागेवर त्यांचे पती आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी दावा केला होता. पती-पत्नीचे नाते इतके बिघडले होते की, त्यांचे अनेक कॉल रेकॉर्डिंग काही दिवसांपूर्वी व्हायरल झाल्या होत्या. पक्षाने पती- पत्नीतील वाद स्वत: मिटविण्याचा सल्ला देत तिकीट राजेश्वर यांना दिले. तसे राजेश्वर यांचा मार्गही सोपा नाही. त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीने माजी मंत्री आणि अखिलेश यादव यांचे निकटवर्ती अभिषेक मिश्रा यांना उमेदवारी दिली. अभिषेक मिश्रा यांचे वडीलही आयएएस होते. अभिषेक आयआयएममध्ये (अहमदाबाद) प्रोफेसर होते.
महिला शक्तीचे प्रतीकगेल्या निवडणुकीत बसपचे नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात लढून स्वाती सिंह महिला शक्तीच्या प्रतीक बनल्या होत्या. यावेळी काँग्रेसने नेहा तिवारी यांना कानपूरच्या कल्याणपूर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. तिवारी यांची बहीण खुशी दुबे यांचे लग्न अमर दुबे यांच्याशी झाले होते. तो लग्नानंतर दोन दिवसांत बिकरू कांडमध्ये विकास दुबेसोबत पोलिसांकडून मारला गेला. तेव्हापासून खुशी दुबे तुरुंगात आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मण स्वाभिमानच्या प्रतीक बनल्या आहेत. प्रियांका गांधी म्हणतात की, जिचे दोन दिवसांपूर्वी लग्न झाले तिला गुन्हेगारी कटात अटक कशी केली जाऊ शकते? त्यांनी आधी खुशी यांची आई गायत्री दुबे यांना तिकीट दिले होते. गेल्या पाच निवडणुकांपासून सतत मतदान करीत असलेल्या गायत्री यांचे नाव शेवटच्या क्षणी मतदार यादीत नव्हते म्हणून नेहा तिवारी यांना मैदानात उतरवले गेले.
पक्ष नाराजसाधूला कोणतीच जात नसते; परंतु उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी क्षत्रिय कुळात जन्म मिळाल्यामुळे स्वत:चा गौरव झाल्याचे वाटत असल्याचे नुकतेच म्हटले. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यावर ठाकुरांवर कृपा करीत असल्याचे आणि ब्राह्मणांविरोधात असल्याचे आरोप होत आले आहेत. ते या वक्तव्यामुळे खरे होत असल्याचे दिसते. याच कारणामुळे पक्षश्रेष्ठी त्यांच्यावर नाराज आहेत.